Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Hadapsar Crime | जमीन विकसित करण्याची स्वप्ने दाखवून मांजरीतील शेतकऱ्याची फसवणूक ; बोगस बँक खाते उघडून करोडो रूपये लाटले…!

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 2 April 2023, 15:21

Hadapsar Crime | हडपसर, (पुणे) : जमीन विकसित करण्याची स्वप्ने दाखवून जमीन मालकाच्या नावे बोगस बँक खाते उघडून त्यामध्ये करोडो रुपयांचे व्यवहार केले. जमीन विकसित करण्याचा करारनामा करूनही कराराप्रमाणे जमीन मालक शेतकऱ्याला पैसे न दिल्याने तीन बांधकाम व्यवसायिक, बँक संचालकासह एकूण सहा जणांविरोधात न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

भूषण पारलेशा, निलेश पालरेशा, विलास थनमल पारलेशा (रा. तिघेही व्हीटीपी हाऊस, फिनेक्स मॉल जवळ, नगर रोड, हडपसर) संजय मुकुंद लेले, नरेश दत्तू मितल्लू,( दोघे रा. जनता सहकारी बँक, शाखा भवानी पेठ, हडपसर, रणवीत गिल (रा. मुंबई) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.

राहुल रामदास तुपे (वय-५२, रा. अन्सारी फाटा, मांजरी बु. ता. हवेली) अशी फसवणूक झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
याप्रकरणी तुपे यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी वरील सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

 

२०१४ साली करारनामा…

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हीटीपी कंपनीचे भागीदार भूषण पारलेशा व त्यांचे भाऊ निलेश पारलेशा यांनी राहुल तुपे यांची जमीन पाहिली व ती विकसित करण्यासाठी त्यांच्यात २०१४ साली करारनामा झाला. करारनामानुसार तुपे यांच्या मिळकतीवर अर्बन बॅलन्स या नावाने प्रकल्प चालू करण्यात आला.

या प्रकल्पात एक अकरा मजली व दुसरी १२ मजली इमारत बांधण्याचे ठरले. कराराप्रमाणे पालरेशा बंधू या दोन इमारती बांधणार होते. इमारतीमध्ये ग्राहकांनी बुकिंग केलेल्या रकमेपैकी ४१.१८ टक्के हे राहुल तुपे यांना व ५८.८२ टक्के व्हीटीपी अर्बन प्रोजेक्ट या कंपनीला वाटून घेण्याचे ठरले  होते.

त्याप्रमाणे जनता सहकारी बँक शाखा, भवानी पेठ येथे खाते उघडण्यात आले. व्हीटीपी अर्बन प्रोजेक्ट पुणे एलएलपी अर्बन बॅलन्स नावाने कलेक्शन अकाउंट दोघांच्या संमतीने काढले होते.

या खात्यावर दोघांच्या सह्या होत्या व करारानुसार खात्यावर टक्केवारीनुसार रक्कम जमा होत होती, डेव्हलपमेंट एग्रीमेंट मध्ये असणाऱ्या वीस अटी व शर्ती या दोघांना बंधनकारक असताना व्हीटीपी कंपनीच्या पालरेशा बंधूंनी काही दिवस ठरल्याप्रमाणे रक्कम तुपे यांच्या खात्यावर जमा केली.

जुलै २०१६ मध्ये जनता सहकारी बँक शाखेतील राहुल तुपे यांचे खाते तपासले असता त्यांच्या लक्षात आले की रकमा दुसऱ्याच खात्यावर जमा होत आहे. एका सहकारी बँकेचे संचालक संजय मुकुंद लेले, मॅनेजर नरेश दत्तू मित्तल व व्हीटीपी अर्बन प्रोजेक्टचे भागीदार भूषण पालरेशा, निलेश पालरेशा विलास थर्मल पालरेशा यांनी आपापसात संगनमत करून चेक बुक देण्याची सुविधा नसताना चेक बुक दिले. ग्राहकांचे पैसे बँकेचे संचालक आणि व्यवस्थापकाच्या मदतीने काढून घेऊन जमीन मालक राहुल तुपे यांची फसवणूक केली.

दरम्यान, यासंदर्भात गुन्हा दाखल करण्याचे आदेश कॅन्टोन्मेंट न्यायालयाने दिले होते. पुढील तपास हडपसरचे पोलीस करत आहेत.
डीएसके, मार्वल, नंतर व्हिपीट कंपनीचाचा प्रकार समोर आल्याने ग्राहकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.यासंदर्भात न्यायालयात जेष्ठ वकील हर्षद निंबाळकर यांनी केस दाखल केली होती.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!

Hadapsar Crime : माता न तू वैरिणी.! आईनेच केली ४ वर्षीय मुलीची निर्घुण हत्या; हडपसर येथील घटना..!

Hadapsar Crime : हडपसर येथे एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमाला अटक

Hadapsar Accident : दुदैवी घटना ! ट्रकच्या धडकेत नवविवाहिता जागीच ठार

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुरंदरात जमिनीच्या वादाला हिंसक वळण; दोन्ही गटांत तुंबळ हाणामारी, 14 जणांवर परस्परविरोधी गुन्हे दाखल

Saturday, 4 July 2026, 13:24

चंदननगरमधील गृहनिर्माण सोसायटीच्या गार्डनच्या जागेवर डल्ला? ‘5 वर्षांचा करार’ सांगून 29 वर्षांचा लीज डीड, माजी पदाधिकाऱ्यांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 13:22

रांजणगाव एमआयडीसी पोलिसांकडून नागरिकांना मिळाले ‘सरप्राईज गिफ्ट’; हरवलेले पावणे चार लाखांचे मोबाईल शोधून केले परत…

Saturday, 4 July 2026, 13:09

दौंड येथे घरात घुसून हिंदू तरुणीचे अपहरण! कमरुद्दीनने कुटुंबीयांना मारहाण करून तरुणीला ओढत नेलं, 5 लाखांची रोकड आणि 7 तोळे सोनंही केले लंपास; 3 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 12:59

लग्नानंतरचा छळ असह्य! माहेरून 3 लाख रुपये आणण्याची सक्ती; विवाहितेची पतीसह पाच जणांविरुद्ध तक्रार दाखल

Saturday, 4 July 2026, 12:26

तोबरेवस्तीत गाभण शेळ्या, बोकडांची चोरी; शेतकऱ्याचे 35 हजारांचे नुकसान

Saturday, 4 July 2026, 12:16
Next Post

Sarpanch News : 'लोकशाही'...! 'सरपंच' झाला जागा अन 'टक्केवारी' बोलू लागली...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.