(Hadapsar Crime) हडपसर, (पुणे) : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पंधरा नंबर येथे हडपसर पोलिसांनी इंधनचोरीचे मोठे रॅकेट उद्ध्वस्त केले असून पेट्रोल आणि डिझेलचे आठ टँकर जप्त करण्यात आहेत. तसेच मुख्य आरोपीसह चार जणांना बेड्या ठोकल्या असून कोट्यावधी रुपयांचा पेट्रोल व डीझेलचा इंधनसाठा जप्त करण्यात आला आहे.
सुनीलकुमार यादव (वय-२४), दाजीराम काळेल (वय-३७), सचिन तांबे (वय-४०), शास्त्री सरोज (वय-४८) आणि सुनील तांबे (वय-३८, रा. सर्वजन हडपसर, पुणे) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत सहायक पोलिस निरीक्षक विजयकुमार शिंदे यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार…!
लोणी काळभोर येथील कंपनीतून इंधन भरून टँकर निघाल्यानंतर पुणे – सोलापूर राष्ट्रीय महामार्गाशेजारील पंधरा नंबर परिसरातून वाहणाऱ्या कालव्याच्या आडबाजूला पेट्रोल- डिझेल चोरीचा प्रकार सुरू असल्याची त्यातून पेट्रोल- डिझेल काढत असल्याची माहिती हडपसर पोलिसांना एका खबऱ्याकडून मिळाली होती.
दरम्यान, मिळालेली माहितीच्या आधारे सदर ठिकाणी पोलीस गेले असता आरोपी टँकर मधून पेट्रोल- डिझेल काढत असल्याचे निदर्शनास आले. हडपसर पोलिसांनी सदर ठिकाणी कारवाई केली आणि पेट्रोल-डिझेलचे आठ टँकर ताब्यात घेतले. यामध्ये कोट्यवधींचा इंधनसाठा जप्त करण्यात आला आहे. आतापर्यंत पाच जणांना अटक करण्यात आली असून, पुढील तपास गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाकडे वर्ग करण्याचे आदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले आहेत.
सुनील तांबे मुख्य आरोपी..!
सुनील तांबे हा यातील मुख्य अवैध धंदेवाला असून यापूर्वीहि सामाजिक सुरक्षा विभागाने त्याला ताब्यात घेतले होते. त्यावेळी राजकीय हस्तक्षेपामुळे त्याच्यावर कारवाई होऊ शकली नव्हती. या कारवाईकडे सर्वांकडे लक्ष लागून राहिले असून आत्तातरी करवाई होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Hadapsar Crime : हडपसर येथे एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमाला अटक