Hadapsar Crime | हडपसर, (पुणे) : पुणे शहर परिसरातून दुचाकी व वाहनचोरी करणाऱ्या बीड येथील दोन अट्टल चोरट्यांना हडपसर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून ७ लाख ३० हजार रुपये किमतीच्या १० दुचाकी जप्त केल्या आहेत.
दत्ता शिवाजी दहिफळे (वय १८, रा. सध्या भेकराई शाळेच्या बाजूला, ढमाळवाडी, भेकराईनगर, हडपसर मुळ राहणार – मु. पो. मारुतीची पांगरी, ता. पाटोदा, जि. बीड), बाबुराव धर्मराज तोंडे (वय १८, रा. मु.पो. आंबेगाव, ता. किल्ले धारूर, जि. बीड) असे ताब्यात घेण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत. हडपसर पोलिसांनी २८ वाहनचोऱ्या उघड केल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे शहरात वाहन चोरीचे गुन्ह्याचे प्रमाण वाढत असल्याने त्याबाबत कारवाई करणेबाबत बैठक घेऊन योग्य त्या सुचना वरीष्ठांनी दिल्या होत्या. दिलेल्या सूचनेनुसार हडपसर पोलीस परिसरात गस्त घालीत असताना दोघेजन संशयरित्या फिरत असल्याचे दिसून आले. त्यांच्याकडे गाडीच्या कागदपात्रांविषयी विचारपूस केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.
विविध कंपनीच्या १० दुचाकी जप्त…
त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी पुणे शहर, बिड या भागातुन वेळोवेळी दुचाकी चोरी केल्याची कबुली पोलिसांना दिली. आरोपींनी आजपर्यंत केलेले ८ गुन्ह्यांची कबुली दिली. तसेच त्याच्याकडून विविध कंपनीच्या १० दुचाकी जप्त केल्या आहेत.
हडपसर पोलीसांनी जानेवारी २०२३ पासून केलेल्या कारवाईमध्ये २७ दुचाकी व १ चारचाकी चोरीचे गुन्हे उघड करून २३ लाख ५० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल माल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी वरिष्ठ हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिगंबर शिंदे, विश्वास डगळे यांचे सूचनाप्रमाणे तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक, विजयकुमार शिंदे, पोलीस उप निरीक्षक अविनाश शिंदे, पोलीस अंमलदार, सुशील लोणकर, संदीप राठोड यांच्या पथकाने केली आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…
Hadapsar Crime | हडपसर पोलिसांचा लॉजवर छापा ; दोन पीडित मुलींची केली सुटका