Hadapsar | पुणे : बाजार समितीच्या आवारात एका व्यापाऱ्याला मारहाण करत त्यांच्या खिशातील रोख रक्कम काढून नेल्याचा धक्कादायक प्रकार पुन्हा एकदा हडपसर मधून समोर आला आहे. त्यामुळे हडपसरमध्ये पुन्हा एकदा गुंडाराज सुरु झाल्याचे चित्र समोर आले आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या स्वर्गीय अण्णासाहेब मगर उपबाजार आवारात या गुंडांनी गोंधळ घालत व्यापाऱ्यांना धक्काबुक्की केली आहे. सोमवारी दुपारी हा प्रकार घडला आहे. त्यामुळे व्यापारी वर्गात पुन्हा एकदा भीतीचे वातावरण तयार झाले आहे.
याप्रकरणी विजय नारायण घुले (वय 53) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यावरून पोलीसांनी चार अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यावेळी व्यापारी भरत मकासरे यांना गुंडांकडून धक्काबुक्की करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, व्यापारी मकासरे यांनी स्वर्गीय अण्णासाहेब मगर उपबाजार आवरात शेतकऱ्याकडून शेतमालाची खरेदी केली होती. खरेदी केलेला हा माल टेम्पोमध्ये भरत असताना आरोपींनी टेम्पोत भरलेले शेतमालाचे कॅरेट जबरदस्तीने बाहेर काढले.
हे कॅरेट घेऊन जात असताना मकासरे यांनी विरोध केला तेव्हा आरोपींनी त्यांना धक्काबुक्की करून त्यांच्या खिशातील बाराशे रुपये रोख जबरदस्तीने काढून दिले आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Khadakwasla Dam | मोठी बातमी : पुण्यातील खडकवासला धरणात ९ मुली बुडाल्या