Gujrat News | नवी दिल्ली : कॉंग्रेसचे माजी खासदार व नेते राहूल गांधी यांना कोर्टाने दोन वर्षाची शिक्षा सुनावल्यानंतर देशातील राजकीय वातावरण ढवळून निघाले असताना आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना गुजरात उच्च न्यायालयाने २५ हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची डिग्री मागीतल्या प्रकरणी हा दंड ठोठावण्यात आला आहे.
केंद्रीय माहिती आयोगाचा (सीआयसी) सात वर्षे जुना आदेश रद्द…
गुजरात उच्च न्यायालयाने शुक्रवारी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पदवीची माहिती गुजरात विद्यापीठाला देण्यास सांगणारा केंद्रीय माहिती आयोगाचा (सीआयसी) सात वर्षे जुना आदेश रद्द केला.
सीआयसीच्या आदेशाविरुद्ध गुजरात विद्यापीठाच्या अपीलला अनुमती देताना न्यायमूर्ती बिरेन वैष्णव यांनी केजरीवाल यांना २५ हजार रुपयांचा दंडही ठोठावला तसेच चार आठवड्यांच्या आत ही रक्कम गुजरात राज्य विधी सेवा प्राधिकरणाकडे (GSLSA)जमा करण्यास सांगितले. दरम्यान केजरीवाल यांना पंतप्रधान मोदी यांची डिग्री मागणे चांगलेच महागात पडले आहे.
दरम्यान, केजरीवाल यांचे वकील पर्सी कविना यांच्या विनंतीनंतरही न्यायमूर्ती वैष्णव यांनी त्यांच्या आदेशाला स्थगिती देण्यास नकार दिला. एप्रिल 2016 मध्ये तत्कालीन केंद्रीय माहिती आयुक्त एम श्रीधर आचार्युलू यांनी दिल्ली विद्यापीठ आणि गुजरात विद्यापीठाला मोदींना मिळालेल्या पदवीची माहिती केजरीवाल यांना देण्याचे निर्देश दिले होते.
तीन महिन्यांनंतर, विद्यापीठाने या आदेशाविरुद्ध न्यायालयात धाव घेतल्यानंतर गुजरात उच्च न्यायालयाने सीआयसीच्या आदेशाला स्थगिती दिली.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा..
Politics : राजकारणातील योगायोग!… खासदारकी गेली राहुल गांधीची ; चर्चा मात्र मनमोहन सिंगाची
Sucide News : पत्नीसह तिच्या 3 मित्रांच्या त्रासाला कंटाळून पतीने केली आत्महत्या ; एकास अटक
Crime News | यवत : रिक्षाचालकाने प्रवाशाला लुबाडले; ४५ हजारांचा मुद्देमाल जबरदस्तीने घेऊन फरार