Gujrat Crime | राजकोट : परकीय व्यापार संचलनालयातील संयुक्त संचालक या क्लास वन अधिकाऱ्याने पाच लाख रुपयांची लाच घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी या लाचखोर अधिकाऱ्यास सीबीआयने सापळा रचून अटक केली आहे. या प्रकरणानंतर या अधिकाऱ्याने चौथ्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली आहे. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे. हा प्रकार गुजरातच्या राजकोट येथे घडला आहे.
जवरीमल बिश्नोई असे लाच घेणाऱ्या आणि त्यानंतर आत्महत्या करणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव आहे.
फूड कॅनच्या निर्यातीसाठी लागणाऱ्या प्रमाणपत्रासाठी तब्बल नऊ लाखांच्या लाचेची मागणी…
याबाबत सविस्तर माहिती अशी की, सीबीआयने पाच लाख रुपयाची लाच घेतल्याप्रकरणी बिश्नोई यांना याप्रकरणी अटक केली होती. बिश्नोई यांनी एका फूड कॅनच्या निर्यातीसाठी लागणाऱ्या प्रमाणपत्रासाठी तब्बल नऊ लाखांच्या लाचेची मागणी केली होती. दरम्यान पहिल्या टप्प्यात त्यांनी पाच लाख रुपयांची मागणी केली व उर्वरित रक्कम एनओसी देताना देण्याचे ठरले.
दरम्यान, लाचेच्या या प्रकरणाची तक्रार सीबीआयला मिळाली त्यानंतर सीबीआयने सापळा रचून बिश्नोई यांना पाच लाख रुपयाची लाच घेताना रंगेहात पकडले व त्यांना अटक केली. त्यानंतर बिश्नोई यांना झालेला प्रकार सहन न झाल्यामुळे त्यांनी आज सकाळी कार्यालयाच्या चौथ्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली.
या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली व मृतदेह ताब्यात घेत तो शवविच्छेदनासाठी पाठवला. पुढील तपास पोलीस करत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!
Pune Crime | व्हॉट्सअॅपवरील मैत्री पडली 38 लाखांना ; महिलेची केली फसवणूक
Pune Crime: कार लावण्यावरून नाना पेठेत तरुणांचा राडा
Chakan Crime | मित्रांसोबत खेळायला गेला अन् पुन्हा परतलाच नाही