पुणे : तळेगाव दाभाडे (ता. मावळ) येथे लग्नासाठी हट्ट करणाऱ्या गर्लफ्रेन्डची ७ लाखाची सुपारी देऊन हत्या करणाऱ्या प्रियकरासह चौघांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे.
बजरंग तापडे, पांडुरंग उर्फ सागर हारके, सचिन थिगळे आणि सदानंद तुपकर अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी बजरंग तापडे याचे एका महिलेशी अनैतिक प्रेमसंबंध होते. अनैतिक संबंधातून महिलेने बजरंग याच्याकडे लग्नासाठी तगादा लावला होता. लग्नासाठी हट्ट धरलेल्या महिलेला बजरंग याने नकार दिला. लग्नासाठी नकार देऊनही महिलेने बजरंगला लग्न करण्यासाठी वारंवार विचारणा केली होती. अखेर वैतागून प्रेयसीला संपवण्याचाच निर्णय बजरंगने घेतला.
त्यानंतर आरोपी बजरंग तापडे याने प्रियेसीची हत्या करण्यासाठी सुपारी सात लाखाला दिली. आणि त्यातील ४ लाख रुपये एडव्हान्स पैसे दिला. आरोपींनी ९ ऑगस्ट रोधारदार शस्त्राने वार करत या महिलेचा खून केला. तळेगाव दाभाडे येथील हि धक्कादायक घटना घडली होती.
दरम्यान, गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या हत्याकांडाचा छडा लावून मुख्य आरोपी बजरंग तापडे, त्याचे साथीदार पांडुरंग उर्फ सागर हारके, सचिन थिगळे, सदानंद तुपकर यांना अटक केली आहे. तरी, पुढील तपास तळेगाव दाभाडे पोलीस करीत आहेत.