चाकण : नाणेकरवाडी येथे एका तरुणाने स्वतःच्याच घरातील लॉकर तोडून चार लाख दहा हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना १८ जानेवारी रोजी उघडकीस आली.
निखिल संतोष सालके (वय १९, रा.नाणेकरवाडी, चाकण) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी संतोष हनुमंत सालके (वय ४८) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
निखिलने घरातील कपाटाच्या लॉकरचा स्क्रू तोडून कपाटातून २५ हजार रोख रक्कम आणि ७ तोळे वजनाचे दागिने असा चार लाख दहा हजारांचा ऐवज चोरून नेला. हा प्रकार १३ ते १८ जानेवारी या कालावधीत घडला.
याबाबत संतोष यांनी आपल्या मुलाच्या विरोधात फिर्याद दिली असून पोलिसांनी निखिल याला अटक केली आहे.