Gautami Patil | पुणे : प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटील हिचा आक्षेपार्ह व्हिडिओ काढून तो व्हिडिओ फेक इंस्टाग्राम अकाउंट वरून व्हायरल करण्यात आला होता. या प्रकारामुळे राज्यभरातून संताप व्यक्त करण्यात आला.
या प्रकरणी पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाला अहमदनगर येथून ताब्यात घेतले होते. आरोपी अल्पवयीन असल्याने त्याला जुवेनाईल कोर्टासमोर हजर केल्यानंतर काही दिवसांच्या कोठडीनंतर कोर्टाने त्याला जामीन मंजूर केला आहे.
गौतमी पाटील हिचा अश्लील व्हिडिओ व्हायरल झाल्याप्रकरणी तिची सहाय्यक मोनिका धुमाळ हिने विमानतळ पोलीस स्टेशन येथे फेब्रुवारी 2023 मध्ये गुन्हा दाखल केला होता.
अहमदनगर येथून ताब्यात घेतलेल्या अल्पवयीन मुलाने ॲड. सुरज संजय शिंदे यांच्यामार्फत जामीनासाठी अर्ज केला होता. अल्पवयीन मुलाच्या वकिलांचा युक्तिवाद मान्य करीत में जुवेनाईल कोर्टाने त्याला योग्य त्या अटी आणि शर्तीवर जामीन मुक्त करण्याचा आदेश दिला.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Gautami Patil : गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमात पुन्हा गोंधळ ; पोलिसांनी केली मध्यस्ती