Tuesday, June 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Fursungi News : फुरसुंगीत सीलबंद घर फोडून पुन्हा ताबा, दोघांवर गुन्हा दाखल

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 22 April 2026, 17:24
Pune Crime: Inter-district gang involved in theft on highway exposed; Three innkeepers arrested, joint action by local crime branch and Shikrapur police

Photo-Social Media

Fursungi News फुरसुंगी, ता. 22 : न्यायालयाच्या आदेशानंतर सीलबंद करण्यात आलेल्या घराचे कुलूप तोडून कर्जदारांनी पुन्हा बेकायदेशीररीत्या ताबा घेतल्याची धक्कादायक घटना फुरसुंगी परिसरात उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे न्यायालयीन प्रक्रियेचा उघड अवमान झाल्याचे समोर आले असून, संबंधित दाम्पत्याविरुद्ध फुरसुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Fursungi News

भागीरथी सुधाकर मटके व सहकर्जदार सुधाकर अण्णाराव मटके (रा. फुरसुंगी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी सदाम हुसेन चौहान (वय ३३, रा. खराडी) यांनी फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी चौहान हे आधार हौसिंग फायनान्स लिमिटेड या कंपनीत रिजनल कलेक्शन मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत. भागीरथी मटके व सहकर्जदार सुधाकर मटके यांनी १९ मार्च २०१८ रोजी सुमारे १६ लाख ७२ हजार ३०३ रुपयांचे गृहकर्ज घेतले होते. सुरुवातीला काही काळ हप्ते भरल्यानंतर नोव्हेंबर २०२१ पासून त्यांनी कर्जफेड थांबवली. त्यामुळे संबंधित खाते ‘एनपीए’मध्ये गेले. Fursungi News

 

यानंतर कंपनीकडून सरफेसी कायद्यानुसार कारवाई करत वारंवार नोटिसा देण्यात आल्या. तसेच ही नोटीस वर्तमानपत्रांत प्रसिद्ध करण्यात आली होती. तरीही कर्जदारांनी कोणतीही दखल घेतली नाही. अखेर जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार मालमत्तेचा ताबा घेण्याची प्रक्रिया राबवण्यात आली. न्यायालयीन आदेशानुसार संबंधित फ्लॅटचा लिलाव करण्यात आला असून, तो शुभम दशरथ माने (रा. भेकराईनगर) यांनी १५ एप्रिल २०२६ रोजी खरेदी केला. त्यानंतर २० एप्रिल रोजी अधिकृत पथकाने पोलीस बंदोबस्तात मालमत्ता ताब्यात घेऊन सीलबंद केली. मुख्य दरवाजावर नोटीस व कंपनीचा बोर्ड लावण्यात आला होता. Fursungi News

मात्र, याच दिवशी सायंकाळी कर्जदारांनी सीलबंद दरवाजाचे कुलूप तोडून नोटीस काढून टाकली आणि कुटुंबासह घरात पुन्हा प्रवेश केला. लिलाव प्रक्रियेनंतरही मालमत्तेवर जबरदस्तीने ताबा मिळवण्याचा हा प्रकार उघड झाल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर फिर्यादीने स्वतः घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता प्रकार उघडकीस आला. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ याबाबत पोलिसांत तक्रार दिली. त्यानुसार कर्जदार दाम्पत्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलम २२३, २४४, ३(५), ३२४(२) व ३२९(३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास फुरसुंगी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक निवृत्ती माने करत आहेत. Fursungi News

 

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

शिवाजीनगर स्थानकाचा गोंधळ अन् वाकडेवाडीचा पर्याय; आरे डेअरीची जागा एसटीला देणार?

Tuesday, 2 June 2026, 22:20

पुणे पोलीस दलात बदल्यांचा दणका! विषारी दारूकांडानंतर 11 वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या तडकाफडकी बदल्या

Tuesday, 2 June 2026, 21:59

पुणे मेट्रोचा मोठा विस्तार! स्वारगेट ते कात्रजचा प्रवास आता होणार ‘भुयारी’; कामाला सुरुवात

Tuesday, 2 June 2026, 21:13

लोणी काळभोर पोलिसांचा दणका! चार सराईत गुन्हेगार दोन वर्षांसाठी तडीपार

Tuesday, 2 June 2026, 20:49

लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांची बदली

Tuesday, 2 June 2026, 20:40

“पुण्यात नरेटिव्ह सेट करणारे कोण? त्यांच्यावर कारवाई का नाही?” पोलीस आयुक्तांच्या दाव्यावर सुप्रिया सुळेंचा थेट सवाल

Tuesday, 2 June 2026, 20:32
Next Post

Pune News : रांजणगाव औद्योगिक वसाहतीत युनियन स्थापनेवरून वाद चिघळला ; घटनास्थळी पोलिसांचा तात्काळ बंदोबस्त

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.