रांजणगाव गणपती, (पुणे) : रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील बेकर्ट कंपनीमध्ये कामगार युनियन स्थापन करण्याच्या मुद्द्यावरून मनसे व भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये तीव्र मतभेद निर्माण झाले आहे. या वादाने काही काळ तणावाचे रूप धारण केल्याने परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीतील कामगारांसाठी स्वतंत्र युनियन उभारण्याच्या प्रयत्नांवरून दोन्ही गटांमध्ये वाद वाढल्याने दोन्ही बाजूंनी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत तणाव आटोक्यात आणला आहे.
तणाव वाढू नये यासाठी पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून भाजपच्या काही स्थानिक पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे औद्योगिक वसाहतीत काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांच्या सतर्कतेमुळे पुढील अनर्थ टळल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, या प्रकरणी अधिक तपास सुरू असून पोलिसांकडून दोन्ही गटांना शांततेचे आवाहन करण्यात आले.







