Saturday, June 13, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लोणी काळभोर पोलिसांचा दणका! चार सराईत गुन्हेगार दोन वर्षांसाठी तडीपार

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 2 June 2026, 20:49

लोणी काळभोर, ता. २ : कदमवाकवस्ती, कुंजीरवाडी व लोणी काळभोर (ता. हवेली) परिसरात दहशत माजवून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या चार सराईत गुन्हेगारांवर लोणी काळभोर पोलिसांनी मोठी कारवाई करत त्यांना तब्बल दोन वर्षांसाठी पुणे शहर, पिंपरी-चिंचवड शहर आणि पुणे ग्रामीण जिल्ह्याच्या हद्दीतून तडीपार केले आहे. भांडणे, जिवे मारण्याचे प्रयत्न, बेकायदेशीर शस्त्रे बाळगणे, गंभीर दुखापत करणे, धमकावणे आणि कायदा-सुव्यवस्थेला बाधा आणणारे विविध गंभीर गुन्हे या आरोपींच्या नावावर असल्याने ही कठोर कारवाई करण्यात आली आहे. अशी माहिती लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी दिली आहे.

टोळी प्रमुख अब्दुल उर्फ अबु इरफान अन्सारी (वय.२४ वर्षे, रा.इंदिरानगर, कदमवाक वस्ती, ता. हवेली, जि.पुणे (टोळी प्रमुख), टोळी सदस्य आकिब इकबाल अन्सारी, वय.२६ वर्षे, रा. इंदीरानगर, कदमवाकवस्ती, हवेली, जि.पुणे), टोळी सदस्य पियुष उर्फ युवराज गणेश भिसे (वय.२१ वर्षे, रा. पाण्याचे टाकीजवळ, , लोणी काळभोर, ता. हवेली, जि.पुणे) व चाँद सरदार पठाण (वय. ५९ वर्षे. वायकरवस्ती, कुंजीरवाडी, ता. हवेली, जि.पुणे) अशी तडीपार करण्यात आलेल्या गुन्हेगारांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चारही आरोपी लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२), ३(५) यांसह आर्म्स ॲक्ट कलम ४(२५), महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१) सह १३५ आणि क्रिमिनल लॉ अमेंडमेंट ॲक्ट कलम ७ अंतर्गत अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.

 

या आरोपींनी वारंवार गुन्हे करून परिसरातील नागरिकांमध्ये भीती निर्माण केली होती. त्यांच्याविरोधात अनेकदा तक्रारी दाखल झाल्यानंतरही त्यांची गुन्हेगारी प्रवृत्ती कायम असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले होते. आरोपींच्या वाढत्या गुन्हेगारी कारवायांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी त्यांच्या गुन्हेगारी अभिलेखांचा सखोल अभ्यास केला. त्यानंतर संबंधित आरोपींना तडीपार करण्याचा प्रस्ताव पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे सादर करण्यात आला.

प्रस्तावातील पुरावे, गुन्हेगारी इतिहास आणि स्थानिक नागरिकांवर होणारा परिणाम याचा विचार करून संबंधित अधिकाऱ्यांनी आरोपींविरोधात कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ५६(१)(अ) आणि (ब) अंतर्गत चारही आरोपींना पुणे शहर, पिंपरी-चिंचवड शहर आणि पुणे ग्रामीण जिल्ह्याच्या हद्दीतून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे. या कालावधीत संबंधित आरोपींना या हद्दीत प्रवेश करता येणार नाही. आदेशाचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर आणखी कठोर कायदेशीर कारवाई होऊ शकते.

दरम्यान, लोणी काळभोर पोलीस ठाण्याने अलिकडच्या काळात सराईत गुन्हेगारांविरोधात सुरू केलेल्या मोहिमेचा हा एक महत्त्वाचा भाग मानला जात आहे. परिसरातील शांतता, नागरिकांची सुरक्षितता आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अशा प्रकारच्या कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. या तडीपार कारवाईमुळे लोणी काळभोर परिसरातील गुन्हेगारी प्रवृत्तींना मोठा आळा बसेल आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना अधिक दृढ होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

ही कारवाई पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार, लोणी काळभोरच्या सहाय्यक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर, पोलीस हवालदार विलास शिंदे, वैजिनाथ शेलार, पोलीस अंमलदार प्रशांत नरसाळे, योगिता भोसुरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावली.

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

उरुळी कांचन सरकारी रुग्णालयात भयंकर प्रकार! डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे चक्क मृतदेहाला लागल्या लाल मुंग्या; शवविच्छेदनाला कित्येक तासांचा विलंब…

Saturday, 13 June 2026, 10:48

चोरांवर पोलिसांची करडी नजर; शिक्रापूर येथे नवनियुक्त पोलीस निरीक्षकांच्या धडाकेबाज मोहिमेमुळे चोरट्यांचे धाबे दणाणले

Friday, 12 June 2026, 20:44

रात्री टॉवर बंद, सकाळी सुरू! जिओ कंपनीच्या संशयास्पद कारभाराने पारोडी ग्रामस्थ वैतागले; तोडगा निघाला नाही तर करणार आंदोलन

Friday, 12 June 2026, 20:33

गुटखा माफियांचा खेळ खल्लास! आता थेट ‘मकोका’अंतर्गत होणार कारवाई; तुकाराम मुंढेंचा दणका

Friday, 12 June 2026, 20:23

सोलापूर हादरले! शेअर मार्केटमध्ये नुकसान अन् पत्नी व मुलांची हत्या करून स्वतःही केली आत्महत्या

Friday, 12 June 2026, 19:41

केडगावमध्ये पूर्ववैमनस्यातून तरुणावर कोयता, रॉड अन् हॉकी स्टिकने हल्ला; तिघांवर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

Friday, 12 June 2026, 19:26
Next Post

पुणे मेट्रोचा मोठा विस्तार! स्वारगेट ते कात्रजचा प्रवास आता होणार 'भुयारी'; कामाला सुरुवात

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.