पुणे- हिंदुस्थान पेट्रोलियम, इंडीयन ऑईल व भारत पेट्रोलियम लिमिटेड या तीनही कंपण्यांच्या डेपोत इंधन टँकरमध्ये भरण्यासाठी सर्व प्रकारची अत्याधुनिक स्वयंचलित मोजमाप करणारी यंत्रणा आहे. मात्र कंपणीचे अधिकारी व वहातुकदार यांच्या अभद्र युतीमुळे भारत पेट्रोलियम लिमिटेड कंपणीच्या डेपोत “बादली” च्या सहाय्याने कांही ठरावीक टॅंकरमध्ये अतीरिक्त इंधन टाकले जात असल्याची बाब पोलीसांच्या तपासात पुढे आल्याची चर्चा आहे.
“EXtra” बादलीच्या या अर्थकारणामुळे भारत पेट्रोलियम कंपणीच्या डेपोत 80 लाख लिटरची तुट आली असल्याचा संशय पोलिसांना आहे. पोलीसांचा वरील संशय़ तपासाअंती खरा निघाला तर “EXtra” बादलीच्या अर्थकारणामुळे पेट्रोलियम कंपणीला इंधन माफियांनी तब्बल शंभर कोटी रुपयांचा चुना लावल्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरु केला आहे. तर दुसरीकडे “EXtra” बादलीच्या अर्थकारणामुळे पेट्रोलियम कंपणीच्या डेपोत 80 लाख लिटरची तुट आली असल्याचा आरोप, भारत पेट्रोलियम कंपणीच्या मुंबई कार्यालयामधील वरीष्ठ अधिकारी अब्बास अख्तर य़ांनी मात्र फेटाळुन लावला आहे.
पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने पुर्व हवेलीमधील तेल कंपण्याच्या डेपोतुन इंधन चोरी होत असल्याच्या संशयावरुन, महिनाभऱापुर्वी तरडे परीसरात कारवाई केली होती. या कारवाीची चौकशी अद्यापही चालु असुन, पोलिसांनी मागिल महिनाभऱात भारत पेट्रोलियम कंपणीच्या डेपोमधील तब्बल एकविस टॅंकर चौकशीसाठी ताब्यात घेतले आहेत. जप्त केलेल्या बहुतांश टॅंकरमध्ये चोर कप्पे असल्याचा संशय पोलिसांना असुन, या गोरख धंद्यात भारत पेट्रोलियम कंपणीचे कांही वरीष्ठ अधिकारी सहभागी असल्याचा संशयावरुन पोलिसांनी संशयित अधिकारी व वहातुकदारांच्या आर्थिक व्यवहाराची माहिती घेण्याचे काम सुरु केले आहे.
सामाजिक सुरक्षा विभागाने टाकलेल्या छाप्यापासुन पुर्व हवेलीमधील हिंदुस्थान पेट्रोलियम, इंडीयन ऑईल व भारत पेट्रोलियम लिमिटेड या तीनही कंपण्यांच्याअधिकारी, इंधन वहातुकदार व पंप चालकांच्यात एकच खळबळ उडाली आहे. त्यातच सामाजिक सुरक्षा विभागाचे अधिकारी रोज नवनवीण लोकांना चौकशीसाठी बोलावत असल्याने, एकुनच इंधन वहातुकदारात संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.
हिंदुस्थान पेट्रोलियम, इंडीयन ऑईल व भारत पेट्रोलियम लिमिटेड या तीनही कंपण्यात इंधन टँकरमध्ये भरण्यासाठी सर्व प्रकारची अत्याधुनिक स्वयंचलित मोजमाप करणारी यंत्रणा आहे. मात्र, तरीदेखील इंधन माफिया कंपणीच्या काही ठराविक लोकांना हातीशी धरून 15 लिटरच्या बादलीने सहा ते सात बादल्या अतिरिक्त टाकुन असल्याचा संशय पोलीसांना आहे. याबाबचे कांही सिसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागलेले आहेत.
टॅंकर आल्यानंतर, कांही टॅंकर चालक बादलीच्या माध्यमातुन टॅंकरची इंधन टाकीदेखील फुल्ल करून घेत असल्याचा संशयही पोलिसांना आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या बहुतांश टॅंकरच्या डिझेल टाकी डेपोत शिरतांना मोकळी तर बाहेर येताना मात्र टाकी फुल्ल आढळल्याचे पोलिसांना आढळुन आलेले आहे. याबाबत पोलिसांनी विविध टॅकर चालकांना विचारलेले खुलाशेच पोलिसांच्या संशयाला बळकाटी देणारे ठरले असल्याची कबुली वरीष्ठ पोलिस अधिकाऱ्यांने दिली आहे.
दरम्यान मागिल दिड वर्षाच्या काळात कंपणीच्या तेल साठ्यात तब्बल 80 लाख लिटरची तफावत आली असल्याचा संशय पोलिसांना आहे. याबाबतचा खुलाशा पोलिसांनी कंपणीकडे मागितला आहे. मात्र कंपणीचे अधिकारी तपासाला सहकार्य़ करण्याऐवजी आडमुठेपणाने वागत आहेत. पोलिसांनी वहातुकदार व अधिकारी या दोघांच्याही बॅंक व्यवहाराची माहिती घेण्यास सुरुवात केली आहे. यातुन पुर्व हवेलीमधील तीनही कंपण्याच्या डेपोमधील फार मोठा इंधन घोटाळा उघडकीस येण्याची शक्यता आहे.
याबाबत भारत पेट्रोलियम कंपणीच्या वतीने बोलतांना कंपणीचे मुंबई कार्यालयामधील वरीष्ठ अधिकारी अब्बास अख्तर म्हणाले, कंपणीच्या तेल साठ्यात मागिल दिड वर्षाच्या काळात 80 लाख लिटरची तफावत आली असल्याचा आरोप बिनबुडाचा आहे. अशी कोणतीही तफावत आलेली नाही. आमचे अधिकारी पोलिसांना सर्वतोपरी सहकार्य करीत आहेत. पोलिसांचा तपास सुरु असतानाच, कंपणीने स्वतःही या प्रकरणाची वरीष्ठ पातळीवर चौकशी सुरु केली आहे.
इंधन नेमके कुठे मुरते याबाबतची सखोल चौकशी करण्याचे आदेश कंपणीच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांकडुन आलेले आहेत. मात्र तेल साठ्यात मागिल दिड वर्षाच्या काळात 80 लाख लिटरची तफावत आली असल्याचा आरोप बिनबुडाचा आहे हे नक्की. वहातुकदारांच्या आर्थिक व्यवहाराबाबत मात्र कंपणीनेही सखोल चौकशी सुरु केली असुन, येत्या आठवडाभरात चौकशी पुर्ण होऊन, अहवाल येण्याची शक्यता आहे. या प्रकरणातील एकाही दोषीला पाठीशी घालणार नसल्याचेही अब्बास अख्तर य़ांनी स्पष्ट केले आहे.