दिनेश सोनवणे
दौंड : कॅन्सर पीडित वृद्ध व त्यांच्या कुटुंबीयांची २ कोटी रुपयांची जमिन फक्त २० लाखात खरेदी करून फसवणूक करणाऱ्या व्यावसायिकासह ७ जणांवर दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
श्रीराम उध्दवराव मांढरे (वय-४०, व्यवसाय कंन्स्ट्रशन . रा सहकार चैक दौंड ता.दौंड जि . पुणे सध्या रा . शिवगौरी अपार्टमेन्ट फ्लॅट नंबर ऐ 6. दिपमळा दौंड ता . दौंड) आणि त्याचे 5 – 6 अनोळखी साथीदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मोजेस डॅनियल यादव ,(वय-६३, रा.पंचवटी अपार्टमेंट बंगलासाईड दौंड ता . दौंड) यांनी दौंड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार मोजेस यादव हे खाजगी कंपनी मधुन सेवानिवृत्त झाले आहेत. ते कॅन्सरचे रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तसेच त्यांची माझी शस्त्रक्रीया देखील झालेली आहे. यादव कुटुंबियांच्या सात जणांच्या नावावर दिपमळा (ता . दौंड) हद्दीत वडीलोपार्जीत मालकीची शेतजमीन गट नं १६४/५ मधील ३५ गुंठे जागा आहे. कॅन्सरच्या उपचारासाठी जास्त खर्च येत असल्याने त्यांनी वडीलोपार्जीत मालकीची जमीन गहाण ठेवण्याची अथवा विकण्याची तयारी केली होती.
तक्रारदार यादव यांना उपचारासाठी असणाऱ्या पैशाची गरज ओळखुन आरोपी श्रीराम मांढरे याने घरी येवून भेट घेतली. व तुम्हाला उपचाराकरीता , ऑपरेशन करीता खुप खर्च लागणार आहे. असे सांगून मांढरे यांनी यादव यांची शेत जमीन गट क्र 164/5 मधील 35 गुंठे विकत घेतो. तसेच मांढरे याने सांगितले कि, माझ्याकडे दौंड येथील श्री संत सोपान काका सहकारी बँक लिमिटेड या बँकेत ४-५ कोटी जमा आहेत. तसेच मी तुम्हला पंधरा मिनीटांत सदर जमीनीचे बाजार भावा प्रमाणे रूपये दोन कोटी रुपयांचे चेकने देवु शकतो. आणि मी दौंडचाच रहीवासी असल्याने तुम्हाला फसवणार नाही. अथवा विश्वासघात करणार नाही. असा विश्वास आरोपी श्रीराम मांढरे याने तक्रारदार मोजेस यादव यांना दिला.
मोजेस यादव यांनी ठरल्याप्रमाणे ३५ गुंठे क्षेत्र आरोपी श्रीराम मांढरे यांना नंबर ५०५७/२०१४ रोजी खरेदी दिली. त्यानंतर मांढरे यांनी श्री संत सोपानकाका सहकारी बँक लिमिटेड सासवड शाखा दौंड बँकेचे एकून आठ चेक दिले होते . त्यातील १० लाख ५० हजार एवढी रक्कम यादव यांना मिळाली. तर १० लाख रक्कम यादव यांची बहिण सिबील जोसेफ बॅप्टीस्टा यांना चेकव्दारे मिळाली आहे. तर उर्वरित १ कोटी ७९ लाख ५० हजार रक्कम यादव यांच्या बहिण आणि भावांना चेकद्वारे दिली होती. मात्र मांढरे यांनी ते सर्व चेक बंद झालेल्या अकांटचे दिलेले होते.
दरम्यान, तक्रारदार मोजेस यादव यांनी याबाबत आरोपी श्रीराम मांढरे यांना विचारणा केली असता, मांढरे यांनी रागाचे भरात सांगितले कि, मला तुमची जमीन नको तुम्ही दुय्यम निबंधक कार्यालयात येवुन तुमचे खरेदीखत रदद करून घ्या. असे म्हणुन मला २८ एप्रिल २०१७ ला पुन्हा दुयम निबंधक कार्यालयात बोलावुन घेतले. तेव्हा आरोपींनी यादव यांना फसवुन सहया घेवुन पुन्हा चुक दुरूस्ती दस्त करून घेतला. आणि पुन्हा सर्व सात लोकांच्या नावाने व वेगवेगळ्या रक्कमेचे नव्याने संत सोपान काका सहकारी बॅक लिमिटेड सासवड शाखा दौंडचे चेक दिले. परंतु सदर सर्व चेक हे पैसे नसलेल्या अकांउटचे दिलेले होते .
त्यानंतर यादव यांनी गेली ४ ते ५ वर्षापासुन वारंवार आरोपी श्रीराम मांढरे यांच्याकडे १ कोटी ७९ लाख ५० हजार रक्कम देण्याबाबत विचारणा केली. मात्र आरोपी मांढरे याने टाळाटाळीचे उत्तरे देवुन पैसे देण्यास नकार देत आहे. यादव यांना आपली फसवणूक झाल्याची लक्षात येताच त्यांनी दौंड पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार दौंड पोलीस ठाण्यात श्रीराम मांढरे व त्याचे ५ ते ६अनोळखी साथीदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरी, पुढील तपास दौंड पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक चवरे मँडम करीत आहेत.