लातूर : लातूर शहरातून धक्कादायक बातमी समोर आली आहे आहे. माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या चुलत भावाने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे.
चंद्रशेखर पाटील चाकूरकर (वय 81 वर्षे) असे आत्महत्या करणाऱ्या चाकूरकरांच्या भावाचे नाव आहे. धक्कादायक बाब म्हणजे चंद्रशेखर यांनी आत्महत्या करण्यापूर्वी अनेकांना ‘गूड बाय’ असा टेक्स मॅसेज केला त्यानंतर त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले आहे. दरम्यान या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे.
81 वर्षीय चंद्रशेखर चाकूरकर हे लातूर शहरातील आदर्श कॉलनी भागात राहत होते. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान चंद्रशेखर यांनी आत्महत्या का केली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिस या मागचा शोध घेत आहेत. चाकूरकर यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात येणार आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.