पुणे : वालचंदनगर येथील ३६ लाखाच्या जबरी चोरीच्या गुन्ह्याची अवघ्या ७२ तासात उकल करून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी ३ आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून रोख रकमेसह तब्बल ३१ लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अमोल विलास होले (वय २५, रा. पारवडी तालुका बारामती जिल्हा पुणे) सचिन राजाराम नाळे (वय २३, मूळ रा.थेरवडी चिलार वस्ती ता.कर्जत जिल्हा अहमदनगर सध्या रा. शिंदे होस्टेल रूम नंबर 3 तांबे नगर ता. बारामती जिल्हा पुणे) आणि जयेश्वर जगन्नाथ मोरे (वय ३० रा. पोहरेगाव ता. रेनापुर जिल्हा लातूर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके यांनी दिलेल्या माहितीनुसार, वालचंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ३६ लाखाच्या जबरी चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींना पकडण्यासाठी पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना दिले होते. त्यानुसार आरोपींना पकडण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके यांच्या मार्गदर्शनानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक बिराप्पा लातुरे व त्यांच्या सहकाऱ्यांचे पथक तयार केले होते.
सदर गुन्ह्याच्या तपास करीत असताना पथकाला, पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाद्वारे व गुन्ह्यात वापरलेल्या स्विफ्ट गाडीचा सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून संशयित आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून गुन्ह्यातील रोख रक्कम २८ लाख ९ हजार तीनशे आणि गुन्ह्यात वापरलेली स्विफ्ट कार असा एकूण ३१ लाख ९ हजार तीनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
दरम्यान, पोलिसांनी तिन्ही आरोपींना ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता, आरोपींनी सदर गुन्ह्याची व कुरकुंभ येथे वेगवेगळ्या कंपनीच्या बॅटऱ्या चोरी केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी आरोपींची वैदकीय तपासणी करून पुढील कार्यवाहीसाठी वालचंदनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे.
हि कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक बिराप्पा लातुरे , पोलीस उपनिरीक्षक गणेश जगदाळे ,अमित सिदपाटील, मेठापल्ली, प्रदीप चौधरी, सहाय्यक फौजदार बाळासाहेब कारंडे, रविराज कोकरे, तुषार पंदारे,काशिनाथ राजापुरे पोलीस हवालदार सचिन घाडगे, राजू मोमीन, जनार्दन शेळके, अभिजीत एकशिंगे, स्वप्निल अहिवळे, अजय घुले, धीरज जाधव, योगेश नागरगोजे आणि दगडु वीरकर यांच्या पथकाने केली आहे.