नाशिक : केंद्रीय तपास यंत्रणा आणि दहशतवाद विरोधी पथकाने मालेगावसह इतर ठिकाणी छापे टाकले आहेत. मुस्लिम संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेचे पाच जण केंद्रीय तपास यंत्रणेच्या ताब्यात घेतले आहे. आणि त्यांची दहशतवाद विरोधी पथकाच्या कार्यालयात चौकशी सुरू आहे.
मालेगाव मधून सैफु रहेमान, पुणे येथून अब्दुल कैय्युम शेख, आणि राझी अहमद खान, कोल्हापूर मधून नसीब मुल्ला, तर बीडवरून वसीम शेख यांना ताब्यात घेण्यात आले आहे. या सर्वांना थोड्याच वेळात नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय तपास यंत्रणेने आज पहाटे एनआयएच्या टीमनं राज्यभरात अनेक ठिकाणी मुस्लिम संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेच्या सदस्यांच्या घरी रात्री ३ वाजता छापेमारी सुरू केली. मुस्लिम संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेकडून अनेक संशयास्पद घटनांचा धोका असल्याचा अलर्ट आल्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याचं सांगण्यात आले आहे .
दरम्यान, पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या वादग्रस्त संघटनेची देशभरात तीन लाख फॅमिली अकाऊंट आहेत . या खात्यांमध्ये फॅमिली मेन्टेनन्सच्या नावाखाली कतार , कुवैत , बहरीन आणि सौदी अरेबियातून ५०० कोटी रुपये आल्याची माहिती समोर येण्याची शक्यता आहे.