सोलापूर : सासरच्या छळाला कंटाळून पहिल्या पत्नीने २ चीमुकलींसह विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना २० जुलै २०१७ला घडली होती. त्यानंतर याच घटनेची पुनरावृत्ती झाली आहे. ५० हजार रुपये हुंडा आणि पती व सासूकडून दिलेल्या छळाला कंटाळून दुसऱ्या पत्नीनेही दोन मुलांसह त्याच विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना कुसळंब (ता. बार्शी) येथे शुक्रवारी (ता.३० सप्टेंबर) सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे. या हृदयद्रावक घटनेमुळे सोलापूर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून सर्वत्र हळहळ वक्त केली जात आहे.
रोहिणी ऊर्फ अनुराधा बाबासाहेब काशीद (वय २२), अनिष बाबासाहेब काशिद (वय- २ वर्ष) व अक्षरा बाबासाहेब काशीद (वय- ४ महिने) अशी मृत्यू झालेल्या माय-लेकरांची नावे आहेत. तर पाच वर्षापूर्वी पहिली पत्नी अनुराधा बाबासाहेब काशीद (वय-२३) हिने आदिती काशीद (वय-५) व अक्षरा काशीद (वय-३) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी अनुराधा हिचे वडील दिलीप सोपान शिंदे यांनी बार्शी तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी पती बाबासाहेब काशीद व सासू छबाबाई काशीद आणि संशयित आरोपी बाबासाहेब शिंदे यांना अटक केली आहे.
बार्शी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाबासाहेब काशीद यांचा खडकोणी येथील दिलीप शिंदे यांची मुलगी रोहिणी ऊर्फ अनुराधा हिच्याशी दुसरा विवाह केला. शुक्रवारी घटनेच्या दिवशी पती बाबासाहेब हे कामानिमित्त तर सासरे प्रभाकर हे बार्शीला बँकेतून पगार आणण्यासाठी गेले होते. दरम्यान, रोहिणी हिने सकाळी १० ते ११.३० वाजण्याच्या सुमारास दोन चिमुरड्यांना घेऊन उडी घेऊन आत्महत्या केली. विद्युत मोटारी लावून सायंकाळी चार वाजता तिघांचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आले.
याप्रकरणी अनुराधा हिचे वडील दिलीप सोपान शिंदे यांनी बार्शी तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी पती बाबासाहेब काशीद व सासू छबाबाई काशीद आणि संशयित आरोपी बाबासाहेब शिंदे यांना अटक केली आहे. आरोपींना बार्शी न्यायालयापुढे हजर केले असता ४ ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
दरम्यान, कुसळंब येथील बाबासाहेब काशीद यांची पहिली पत्नी अनुराधा बाबासाहेब काशीद (वय २३) हिने आदिती काशीद (वय ५) व अक्षरा काशीद (वय ३) या दोन मुलींना स्वतः च्या कमरेला साडीने बांधून घेऊन २० जुलै २०१७ रोजी स्वतःच्या शेतातील त्याच विहिरीत आत्महत्या केली होती. तेव्हा जाचहाट व जात्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पांगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.