FIR | पुणे- लोकल पाण्याच्या जारवर ‘माणिकचंद ऑक्सिरिच’ चे लेबल लावून त्या जारची विक्री केल्याप्रकरणी ऑक्सिटॉप कंपनीच्या मालकावर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार मे 2023 मध्ये वाकी खुर्द, चाकण येथे उघडकीस आला.
याप्रकरणी माणिकचंद ऑक्सिरीच वॉटर तयार करणार्या आरएमडी फुड्स अँड बेव्हरेजस या कंपनीच्या संचालिका शोभा रसिकलाल धारीवाल (वय – 68, रा. कोरेगाव पार्क, पुणे) यांनी चाकण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून ऑक्सिटॉप कंपनीचा मालक महेंद्र गोरे (रा. वाकीखुर्द, चाकण) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार माणिकचंदच्या संचालिका धारिवाल यांना आपल्या कंपनीच्या लेबल सारखे बनावट लेबल असलेल्या पाण्याचे जार व पाणी बॉटल विक्री साठी अनेक ठिकाणी दिसून आल्या. त्यानंतर त्यांनी याबाबत माहिती घेतली तेव्हा त्यांना बनावट पाण्याची बाटली महिंद्रा ऑक्सिटॉप कंपनीची असल्याचे दिसून आले. या कंपनीबाबत चौकशी केली असता त्यांना ही कंपनी महेंद्र गोरे यांची असल्याची माहिती मिळाली.
दरम्यान, अधिक माहीती घेण्यासाठी व्यापार विभागाशी संपर्क साधला असता फिर्यादी यांना आरोपीने कोणतीही ट्रेड मार्क मान्यता घेतली नसल्याचे समोर आले. त्यानंतर धारिवाल यांनी चाकण पोलीसात तक्रार दाखल केली.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Daund Crime : दौंडमधील गोहत्या करणाऱ्या टोळीवर तडीपारीची कारवाई