युनुस तांबोळी
Shirur News : टाकळी हाजी, ता.१० : पुणे- नगर जिल्ह्याच्या सीमेवरील कुंड पर्यटन स्थळावर हात पाय धुण्यासाठी गेलेल्या महिलेचा मंगळवारी (ता..८) सायंकाळी पावणे पाच च्या सुमारास पाय घसरून रांजणखळग्यात पडल्या होत्या. कुंडात वाढता पाण्याचा प्रवाह यामुळे शोधमोहिमेला अडचणीचा सामना करावा लागला. अखेर रांजणखळग्यात पडलेल्या महिलेचा मृतदेह तब्बल ३८ तासांनंतर गुरूवारी (ता.१०) सकाळी सापडला आहे.(Shirur News)
शोधमोहिमेला अडचणीचा सामना करावा लागला.
वाशिम जिल्ह्यातील पद्माबाई शेषराव काकडे (रा.मोहगव्हाण ता. कारंजा) ही ५५ वर्षीय महीला नातेवाईकांसोबत रांजण खळगे पाहत असताना तिचा पाय घसरल्याने पाण्याच्या प्रवाहात पडली होती. तिला वाचविण्यासाठी तिचे जावई महेंद्र शहादेव औताडे यांनी पाण्यात उडी घेतली. काही अंतरापर्यंत त्यांनी महिलेला पकडले.(Shirur News)
दरम्यान, पण पाण्याच्या वेगामुळे खाली खोलातील खड्ड्यात महिला गेल्याने तिची साडी औताडे यांच्या हातात राहिली होती. सोबत असलेल्या नातेवाईकांनी आरडा ओरडा केल्यामुळे स्थानिकांनी तिकडे धाव घेत महेंद्र औताडे यांना पाण्यातून बाहेर ओढले मात्र महिलेचा तपास लागला नाही.(Shirur News)
पर्यटकांनी रांजणखळगे पाहण्यासाठी आल्यानंतर फोटोसेशन करताना किंवा पर्यटनाचा आनंद लुटताना योग्य ती खबरदारी घ्यावी. असे आवाहन टाकळी हाजी ग्रामपंचायतीच्या वतीने पर्यटकांना करण्यात आले आहे.(Shirur News)