पुणे : वीज तोडण्याची भीती दाखवून एका सायबर चोरट्याने ज्येष्ठ महिलेला तब्बल ८ लाखाचा गंडा घातल्याचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार कोरेगाव पार्क परिसरात उघडकीस आला आहे.
याप्रकरणी एका ज्येष्ठ महिलेने कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात सायबर चोरट्याच्या विरोधात सायबर चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिलेच्या मोबाइल क्रमांकावर चोरट्याने संपर्क केला. चोरट्याने महावितरणमधून बोलत असल्याची खोटी बतावणी केली. आणि गेल्या महिन्यात वीज बिल भरले नसल्याने वीज कापण्याची कारवाई करण्यात येणार आहे. आधी धमकी चोरट्याने महिलेला दिली.
त्यानंतर चोरट्याने महिलेला क्विक सपोर्ट ॲप डाऊनलोड करण्यास सांगितले. महिलेने संबंधित ॲप डाऊनलोड केले. त्याद्वारे चोरट्याने महिलेच्या बँक खात्याची गोपनीय माहिती काढून घेतली. आणि महिलेच्या बँक खात्यातून ७ लाख ६६ हजार ५९ रुपये लांबविले. महिलेला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी कोरेगाव पार्क पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी माहिती-तंत्रज्ञान कायदा; तसेच फसवणूक केल्या प्रकरणी चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरी पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपाली भुजबळ करीत आहेत.
दरम्यान, महावितरणकडून वीज तोडण्यात येणार असल्याची भीती दाखवून नागरिकांची फसवणूक करण्याचे प्रकार वाढले आहेत. अशा प्रकारच्या बतावणीवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.