पुणे – नाताळानिमित्त मित्रासोबत फिरण्यासाठी गेलेल्या तरुणीचा अपघातात जागीच मृत्यू झाला. हा अपघात २५ डिसेंबरला मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास भैरोबानाला परिसरात घडला. मित्राचे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला.
व्यंकटप्रसन्ना श्रीनिवास विपुरी (२२ रा. घोरपडी, मुंढवा, पुणे) असे ठार झालेल्या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी विल्सन मार्रिश पिल्ले (२२ रा. महंमदवाडी, पुणे) याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी सुषमा विपुरी ( १९, रा. मुंढवा, पुणे) यांनी तक्रार दिली आहे.
व्यंकटप्रसन्ना आणि विल्सन २५ डिसेंबरला नाताळनिमित्त रात्री भैरोबानाला परिसरातून दुचाकीने जात होते. या वेळी विल्सनने दुचाकी भरधाव चालवल्यामुळे त्याचे नियंत्रण सुटले. त्यामुळे दुचाकी घसरून पाठीमागे बसलेली व्यंकटप्रसन्ना खाली पडली. यात तिला गंभीर दुखापत होऊन तिचा जागीच मृत्यू झाला.
याप्रकरणी विल्सन याला वानवडी पोलिसांनी अटक केली आहे.