पुणे : पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर गुरुवारी (ता. १८) मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात पाच एकाच कुटुंबातील ५ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.
मुंबईच्या दिशेने येत असलेल्या अर्टिगा कारला बोरघाटात एका वाहनाने धडक दिल्यामुळे हा अपघात झाला. या अपघातात अर्टिगाचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. जखमींना पनवेल येथील एमजीएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
मुंबईच्या दिशेने येत असलेल्या अर्टिगा कारला रात्री बारा वाजताच्या सुमारास अपघात झाला. पिंपरी चिंचवड येथे राहणारे कुटुंब मुंबईला जात होते. यावेळी बोरघाटात ढेकू गावाच्या हद्दीत एका अज्ञात वाहनाने कारला धडक दिली.
ही धडक इतकी भीषण होती की गाडी रस्त्याच्या कडेला जाऊन पडली. तर दरवाजा मोडल्याने प्रवासी बाहेर फेकले गेले. अतिरक्तस्त्रावामुळे काही जणांनी घटनास्थळीच प्राण सोडले.
अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे :
१) अब्दुल रहमान खान,३२ वर्षे, घाटकोपर २) अनिल सुनिल सानप, ३) वसीम साजिद काझी, रा.राजापूर, जि. रत्नागिरी ४) राहुल कुमार पांडे, वय-३० वर्षे, फ्लॅट न.-६०५, रिद्धेश्वर हौ. सो., कामोठे. नवी मुंबई ५) आशुतोष नवनाथ गांडेकर, २३ वर्षे, ५, अशोक धर्मा चाळ, म्हातारपाडा, अंबोली, अंधेरी(प), मुंबई
दरम्यान, महामार्गावरून जात असलेल्या एका कार चालकाने महामार्ग पोलिसांना हा प्रकार कळवला. त्यानंतर काही वेळातच महामार्गावरील आणि स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि मदतकार्य सुरु करण्यात आले. तिघा जखमींना एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.