लोणी काळभोर (पुणे) : पुणे-सोलापुर महामार्गावरील लुटारु टोळीने मागील पंधरा दिवसाच्या काळात सोलापुर जिल्हातील टेभुर्णी परीसरातील तब्बल चौदा शेतकऱ्यांना कवडीपाट ते यवत या दरम्यान बेदम मारहान करुन, त्यांच्याकडे शेतीमाल विक्रीतुन आलेले लाखो रुपये लुबाडल्याचे स्पष्ठ झाले आहे. कवडीपाट ते यवत दरम्यान लुटारु टोळी सक्रीय झाल्याची माहिती शहर व ग्रामिन पोलिसांना मिळुनही, दोन्ही पोलिस दलातील अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्यानेच शेतकऱ्यांना मारहानीला सामोरी जावे लागल्याचा आरोप टेभुर्णी परीसरातील शेतकरी व शेतीमाल वहातुक करणाऱ्या हातुकदारांनी केला आहे.
पुणे प्राईम न्यूजने रविवारी (ता. 9) पुण्यातील बाजार समितीत शेतमालाची विक्री करुन घराकडे निघालेल्या सोलापूर जिल्हातील शेतकऱ्यांना पुणे-सोलापूर महामार्गावर कवडीपाट ते यवत दरम्यान रस्त्यात मारहान करुन, त्यांच्याकडील रोख रक्कम व इतर किंमती ऐवज लुटणारी टोळी सक्रीय झाल्याबाबतचे वृत्त सर्वप्रथम प्रसिध्द केले होते. पुणे प्राईम न्यूजमधील बातमी वाचुन, टेभुर्णी परीसरातील एका केळी वहातुकदारांने पुणे प्राईम न्यूजला मागिल पंधऱा दिवसाच्या काळात टेभुर्णी परीसरातील वांगी, गोटी सह चार गावातील तब्बल चौदा शेतकऱ्यांना कवडीपाट ते यवत दरम्यान मारहान करुन लुटल्याची माहिती दिली.
उरुळी कांचन हद्दीत पुणे-सोलापूर रोडवर शुक्रवारी (ता. ७) दुपारी भर दिवसा दुचाकीवरुन आलेल्या दोन युवकांनी सोलापूर जिल्हातील माढा तालुक्यातील उजनी परीसरातील दोन शेतकऱ्यांना मारहान करुन, त्यांच्या जवळील रोख रक्कम व टेपोमधील किंमती ऐवज लुटल्याचा धक्कादायक पुढे आला होता. दुचाकीवरुन येऊन शेतकऱ्यांना मारहान करुन लुटणाऱ्या, दोघांचे सिसीटिव्ही फुटेज शेतकऱ्यांनी पुणे प्राईम न्यूजकडे पाठवले असुन, या फुटेजच्या आधारे लुटमार करणाऱ्या टोळीच्या मुसक्या अवळाव्यात अशी मागणी उजनी परीसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.
माढा तालुक्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे-सोलापूर महामार्गावर कवडीपाट ते यवत दरम्यान मागील पंधऱा दिवसापासुन दुचाकीवरुन फिरणारी सहा ते सात जणांची टोळी सक्रीय झाली आहे. पुणे बाजार समितीमधुन केळी विकुन आलेला शेतकरी ज्या टेपोंत बसलेला आहे, तो टेंपो कवडीपाटहुन यवतकडे निघाला की वरील टोळीतील मोटासरसायकल स्वार हा टेपोला मोटारसायकल आडवी मारुन भांडण सुरु करतो. तयाच दरम्यान त्याचे आनखी साथीदार टेंपोजवळ येऊन, शेतकरी व टेंपोचालकाला मारहान करुन, त्यांच्या जवळील रोख रक्कम व टेंपोमधील किंमती वस्तु घेऊन पसार होतात. वरील टोळीने मागिल पंधरा दिवसापासुन धुडगुस घातला असुन, सोलापुर जिल्हातुन शेतीमाल घेऊन येण्यास वहातुकदार व शेतकरी घाबरु लागले आहेत.
पोलिसांनो आत्तातरी सक्रीय व्हा…
कवडीपाट ते यवत दरम्यान लुटारु टोळी सक्रीय झाल्याची माहिती शहर व ग्रामिन पोलिसांना तीन ते चार दिवसापुर्वीच मिळालेली आहे. टोळीतील एका सदस्यांचा फोटो व सिसीटीव्ही फुटेजही व्हायरल झालेले आहे. या सिसीटीव्ही फुटेजमधील तरुण हा उरुळी कांचन परीसरातील असल्याची शक्यता पोलिस खाजगीत बोलत आहे. मात्र शहर व ग्रामिन पोलिस अद्यापही वरील घटनेबाबत गंभीर झाल्याचे दिसुन येत नसल्याने, शेतकऱ्यांना कोणी वाली आहे की नाहृी अशी भिती निर्माण झाली आहे. यामुळे पोलिसांनो आत्तातरी सक्रीय व्हा व टोळीला पकडा अशी आवाहन करण्याची वेळ शेतकऱ्यांच्यावर आली आहे.