मुंबई : लग्नाचे आमिष दाखवून फिटनेस ट्रेनर आदित्य कपूरने वारंवार बलात्कार केल्याचा आरोप एका प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्रीने केला आहे. त्यामुळे चित्रपटसृष्टीत मोठी खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी पिडीत अभिनेत्रीने फिटनेस ट्रेनर आदित्य कपूरच्या विरोधात मुंबईत तक्रार दिली आहे. त्यानुसार मुंबई पोलिसांनी फिटनेस ट्रेनर आदित्य कपूरवर आयपीसी 376, 323, 504 (2), अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आदित्यने दाक्षिणात्य अभिनेत्रीला लग्नाचे अमिष दाखवले आणि तिच्याशी संबंध ठेवले. पिडीत अभिनेत्रीने आदित्यला लग्नाविषयी विचारले असता, आदित्यने याकडे दुर्लक्ष केले. पिडीत अभिनेत्रीला लक्षात आले कि, आदित्य लग्नाविषयी विचारले असता, टाळाटाळ करत आहे. त्यामुळे पिडीत अभिनेत्रीने पोलिसांकडे धाव घेतली. आणि याप्रकरणी आदित्यच्या विरोधात तक्रार दिली. त्यानुसार, मुंबई पोलिसांनी फिटनेस ट्रेनर आदित्य कपूरच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. मुंबई पोलिसांनी याप्रकरणाची दखल घेऊन तपासाला सुरुवात केली आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून इंडियन फिल्म इंडस्ट्रीतील लैंगिक शोषणाच्या अनेक बातम्या व्हायरल झाल्या आहेत. त्यातच पिडीत अभिनेत्री २०१६ पासून साऊथच्य फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करीत आहे. तिचा मोठा चाहतावर्ग आहे. तिने फिटनेस ट्रेनर आदित्य कपूर याच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. यामुळे चित्रपटसृष्टीत मोठी खळबळ उडाली आहे.