Wednesday, September 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Fake Journalist Case : पुण्यातील उद्योजकाकडे खंडणी मागीतल्याप्रकरणी सोलापूरच्या खंडणीखोर पत्रकार बंधुना पाच दिवसाची पोलिस कोठडी, पुणे शहर व परीसरात बनावट व खंडणीखोर पत्रकारांचा सुळसुळाट सुरु..

जनार्दन दांडगेby जनार्दन दांडगे
Friday, 19 May 2023, 18:26

जनार्दन दांडगे.
पुणे Fake Journalist Case- खराडी येथील सॉफ्टवेअर कंपनीचे मालक संतोष पोपट थोरात (रा. अल्कॉन सोसायटी, खराडी) यांच्याकडे ५ कोटी रूपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी सोलापुर मधील “एम एच 13 न्युज” या वृत्तवाहिनीच्या खंडणीखोर पत्रकार बंधुना न्यायालयाने पाच दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. (Fake Journalist Case)

महेश सौदागर हनमे (वय-४७) आणि दिनेश सौदागर हनमे (वय-४४, दोघे रा. राजेश्वरी नगर, ब्लॉक नं. ११२, बाळे, उत्तर सोलापूर, जि. सोलापूर) ही त्या खंडणीखोर पत्रकारांची नावे असुन, ते सोलापुरमधील “एम13न्युज”या वृत्तवाहिनीचा मालक व चालक म्हणुन वावर आहेत. दरम्यान हनमे बंधुनी पुण्यातील उद्योजकाबरोबरच सोलापूरमधील बिल्डरकडे ५० लाख अन् २ फ्लॅटची खंडणी मागितल्याचे पुणे शहर पोलिसांच्या खंडणी विरोधी पथक-2 ने केलेल्या प्राथमिक तपासात निस्पन्न झाले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खंडणी विरोधी पथक-2 चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रताप मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक चांगदेव सजगणे, पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण, पोलिस उपनिरीक्षक मोहनदास जाधव, पोलिस अंमलदार विजय गुरव, प्रदिप शितोळे, विनोद साळुंके, संग्राम शिनगारे आदी वरील तोतया पत्रकारांच्या मागावर असतांना, काल (गुरुवारी) सायंकाळी हनमे बंधुंनी पाटस टोलनाक्यावर पोलिसांच्या अंगावार चारचाकी घालून त्यांना जीव ठार मारण्याचा प्रयत्न केला होता.

पोलिसांनी प्रसंगावधान राखून बचावासाठी त्यांच्या गाडीच्या मागील टायरच्या दिशेने गोळीबार देखील केला होता. त्यांना पाठलाग करून पाटस टोलनाक्यावरून अटक करण्यात आले होते. दरम्यान पोलिसांनी हनमे बंधुंच्याकडे चौकशीत, सोलापूरमधील बिल्डरकडे ५० लाख अन् २ फ्लॅटची खंडणी मागितल्याचे निस्पन्न झाले आहे. या प्रकरणी संबधित बांधकाम व्यावसायिकांने पोलिसांना संपर्क साधुन वरील माहिती दिली आहे.

 

बनावट व खंडणीखोर पत्रकारांचा सुळसुळाट…

पुणे शहर व परीसरात मागील वर्षभराच्या काळात सहाहुन अधिक कथीत पत्रकारांच्यावर खंडणीचे गुन्हे दाखल झाले आहेत. लोणी काळभोर मधील एक पत्रकार मागील पंधरा दिवसापासुन जेलची हवा खात आहे. तर सोलापुरच्या हनमे बंधुनी तर कहरच करुन टाकला आहे. मागील कांही महिण्यापासुन पुणे शहर व परीसरात विषेशतः पुर्व हवेलीत बोगस पत्रकारांचे पेव फुटले आहे. आम्ही पत्रकार आहोत हे पहा आमचे प्रेस कार्ड असे म्हणत अनेक कथित बोगस पत्रकार व्यावसायिक आणि नागरिकांची लूट करत आहेत.

ना डिग्री, ना अभ्यास, ना चार ओळी लिहिण्याची अक्कल, ना कुठले अधिकृत चॅनेल किंवा पेपर मात्र तरीही काही महाभाग प्रेस चे बोगस आयडी कार्ड तयार करून त्याचा वापर ब्लॅकमेलिंग आणि खंडणीसाठी करत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे शासनाने आता अश्या मान्यता न घेता बोगस चॅनेल आणि पोर्टल चालवून प्रेस आयकार्ड वाटणाऱ्यांवर कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे. तसेच पत्रकारांचे अधिकृत/अनधिकृत धोरण आखून बोगस चॅनेल्स चालवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे.

खंडणी मागितल्यास थेट गुन्हे शाखेकडे संपर्क साधा- पोलिसांचे आवाहन..

दरम्यान, पुणे शहर पोलिसांच्या हद्दीत कोणी खंडणीची मागणी करत असेल, मग तो पत्रकार असो इतर कोणी खंडणीखोर, नागरीकांनी थेट गुन्हे शाखेकडे अथवा पोलिस आयुक्तालयात संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे. तक्रार करणाऱ्या नागरीकांची नावे गोपनीय ठेवण्यात येणार असल्याचेही पोलिसांनी स्पष्ठ केले आहे. तसेच महेश हनमे व दिनेश हनमे या दोघांनी आनखी कोणाला खंडणी मागितली असल्यास, संबधितांनी थेट पुणे शहर पोलिसांच्या खंडणी विरोधी पथक (2) यांच्याकडे संपर्क करावा असे आवाहनही पोलिसांनी केले आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Breaking News : सोलापूरच्या दोन “कथित पत्रकारांना” ५ कोटीच्या खंडणी प्रकरणी पाटस टोल नाक्यावर अटक ; पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न, तर पोलिसांकडून गोळीबार…

Loni Kalbhor Crime : मुलांची “शालेय कागदपत्रे” काढुन देण्याच्या बहाण्याने लोणी काळभोर येथील एका “कथित” पत्रकाराकडुन महिलेची मोठी आर्थिक फसवणुक, पैसे परत मागताच महिलेला व तिच्या दोन मुलांना जिवे मारण्याची धमकी, लोणी काळभोर पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या…

Pune Extortion News : पोलिस व पत्रकारांची भिती घालुन तब्बल १० लाख रूपयाची खंडणी मागितल्या प्रकरणी मानव विकास परिषदेच्या प्रदेश अध्यक्ष संदिप कुटे यांच्यावर गुन्हा दाखल…

जनार्दन दांडगे

जनार्दन दांडगे

गेल्या २३ वर्षापासून पत्रकारीता क्षेत्राचा अनुभव आहे. दैनिक सकाळ च्या माध्यमातून गेली २१ वर्षे कार्यरत, नि:पक्षपातीपणे काम, जिल्ह्यातील गुन्ह्यांच्या बातम्यांकडे जास्त भर, ६ वर्षापूर्वी भाईचंद हिराचंद रायसोनी (BHR) या पतसंस्थेचा १६०० कोटी रुपयांचा घोटाळा उघडकीस आणण्यासाठी हातखंडा तर १४ वर्षांपूर्वी एका बिल्डरचा ४५० कोटी रुपयांचा बँकिंग घोटाळा उघडकीस आणला, नागरिकांच्या समस्या बातम्यांच्या माध्यमातून समाजासमोर मांडण्याचा प्रयत्न,जिल्ह्यातील बेकायदा वाळू, जुगार, मटका, दारू आणि अवैध धंदे यांच्यावर कारवाईची मागणी, प्रशासनाच्या माध्यमातून नागरिकांना योग्य न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न, राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण यांच्या लेखनात विशेष प्राविण्य. सध्या पुणे प्राईम न्यूज चे मुख्य संपादक म्हणून कार्यरत आहेत.

ताज्या बातम्या

दुष्काळाच्या छायेत 305 तालुके! शेतकऱ्यांसाठी सरकारने घेतले मोठे निर्णय; जाणून घ्या अधिक माहिती

Wednesday, 30 September 2026, 8:37

दिवेघाटातून जाणाऱ्यांनो थांबा! आज 2 तास रस्ता पूर्ण बंद; नेमकी काय आहे कारण? वाचा

Wednesday, 30 September 2026, 8:25

4 राऊंड फायर, छातीत 2 गोळ्या अन् मृत्यू! ठाण्यात शिवसेना नेता प्रदीप पूर्णेकर यांची हत्या; तपासात धक्कादायक दावे

Wednesday, 30 September 2026, 8:20

Maharashtra Weather: सप्टेंबरचा शेवटचा दिवस ठरणार वेगळा! महाराष्ट्रात पाऊस, ढग आणि उकाड्याचं चित्र; पाहा आजचं हवामान

Wednesday, 30 September 2026, 8:09

Daily Horoscope: 30 सप्टेंबरला ग्रहस्थितीचा मोठा परिणाम! नोकरी, व्यवसाय आणि पैशांबाबत कोणासाठी काय घडणार?

Wednesday, 30 September 2026, 7:30

रेवंत रेड्डींचं वादग्रस्त विधान; ‘राम श्रीमंतांचा, महादेव गरिबांचा देव’ म्हणताच वाद पेटला..

Tuesday, 29 September 2026, 23:05
Next Post

Shocking news! : धक्कादायक! वाढदिवसाच्या पार्टीमध्ये नाचताना तरुणाचा मृत्यू

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp