Extortion | पुणे : कंपनीचा सर्व डाटा माझ्याकडे आहे. तुझ्या व्यवसायाची वाट लावून टाकीन तसेच तुझ्या मुलाला जीवे ठार मारेल अशी धमकी देऊन सुपरवायझरनेचे मालकाकडे 50 लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार २०१८ पासून आतापर्यंत सुरु होता.
याप्रकरणी दिनेश वासु शेट्टी (वय ६४, रा. खराडी) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी विश्वास धोंडु राऊत (वय ४०, रा. गणेश चाळ, मुंबई) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे मास्टर प्रो फॅसिलिटी सर्व्हिसेस प्रा. लि. ही कंपनी आहे. कंपनीमध्ये विश्वास राऊत हा सुपरवायझर म्हणून काम करीत होता. कंपनीच्या खराडी येथील गेरा स्काय व्हिला अपार्टमेंट टॉवरमधील कार्यालयात असलेल्या कॅश लॉकरमध्ये कामगारांचे पगार देण्यासाठी 2 लाख 54 हजार रुपये ठेवले होते. ते पैसे राऊत याने चोरले.
कंपनीतील गोपनीय कागदपत्रे कस्टमर डाटा चोरी…
कंपनीतील गोपनीय कागदपत्रे कस्टमर डाटा चोरुन नेला. त्यानंतर सेल्स ऑफिसजवळ येऊन फिर्यादी यांना तुझ्या कंपनीचा सर्व डाटा माझ्याकडे आहे. तुझ्या व्यवसायाची वाट लावून टाकील व तुझ्या मुलाला जीवे ठार मारीन, अशी धमकी दिली. हे सर्व थांबावायचे असेल तर 50 लाख रुपयांची खंडणीची मागणी केली. पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक घोडके तपास करीत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!