मुंबई : जामिनाच्या स्थगितीला मुदतवाढ देण्याची सीबीआयची ही मागणी उच्च न्यायालयाने फेटाळल्याने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. आज मुंबई उच्च न्यायालयाने दिलेली स्थगितीची मुदत संपणार असून अनिल देशमुख उद्या तुरुंगातून बाहेर येण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होईपर्यंत जामिनाची स्थगिती वाढवावी, अशी मागणी सीबीआयने केली होती.
काही दिवसनापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना जामीन मंजूर करण्यात आला होता. मात्र, सीबीआयने न्यायालयाला विनंती करताना देशमुख यांच्या जामिनाला स्थगिती देण्याची मागणी केली होती. न्यायालयाने सीबीआयची मागणी मंजूर करताना अनिल देशमुख यांच्या जामिनाला स्थगिती दिली होती.
त्यामुळे अनिल देशमुख यांना १० दिवस तुरुंगातच राहावे लागले होते. आज देखील सीबीआयच्या वतीने पुन्हा जामिनाला स्थगितीची मागणी करण्यात आली होती मात्र, न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावली. त्यामुळेच अनिल देशमुख यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला आहे.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना १ लाखांच्या जातमुचलक्यावर जमीन मंजूर कारण्याता आला होता. हा जामीन मंजूर करताना न्यायालयाने काही महत्वपूर्ण अटी घातल्या होत्या. त्यानुसार अनिल देशमुख यांना पासपोर्ट तपस यंत्रणांकडे जमा करावा लागणार असून न्यायालयाच्या परवानगीशिवाय देशाबाहेर जाता येणार नाही या मुख्य अटी घालण्यात आल्या आहेत. त्याबरोबरीने आठवड्यातून दोन दिवस त्यांना ईडी कार्यालयात हजेरी लावण्याबरोबरीने तपास यंत्रणांना तपासात पूर्ण सहकार्य करण्याचे निर्देश न्यायालयाच्या वतीने देण्यात
सुमारे १ नोव्हेंबर २०२१ रोजी आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणी चौकशीसाठी ईडी कार्यालयात दाखल झाले होते, त्याचदिवशी ईडीकडून त्यांना अटक करण्यात आली होती. तेव्हापासून अनिल देशमुख अटकेत होते.
दरम्यानच्या काळात अनिल देशमुखांच्या विरोधात उच्च न्यायालयाच्या निर्दशानंतर सीबीआयने गुन्हा दाखल केला होता. त्याप्रकरणीही देशमुखांना अटक झाली होती. एकाच वेळी दोन तपास यंत्रणांच्या दोन गुन्ह्यांमध्ये देशमुख अटकेत होते.