इंदापूर : जाचकवस्ती (ता. इंदापूर) ग्रामपंचायत हद्दीतील ३९ फाटा येथे पती-पत्नीने एक दिवसाच्या अंतराने आत्महत्या (sucide) केल्याची धक्कादायक घटना नुकतीच उघडकीस आली आहे. या घटनेने परिसरात शोककळा (mourning) पसरली आहे.
रेश्मा आयुब शेख (reshama aayub shaikh ) (वय – ३० व आयुब बाशा शेख (वय, ३५ रा. दोघेही जाचकवस्ती, ता. इंदापूर) असे आत्महत्या केलेल्या पती-पत्नीची दोघांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जाचकवस्ती ग्रामपंचायत हद्दीत रेश्मा व आयुब हे दोघेजण राहत होते. रेश्मा शेख यांना पती व सासू कडून मानसिक व शारीरिक त्रासाला कंटाळून गुरुवारी (ता. ०२) रात्री विषारी औषध (poisonous drug) घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. रेश्माला खासगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू (death) झाल्याची घटना घडली.
रेश्माच्या मृत्यूनंतर रेश्माची आई रशिदा सैफन शेख (रा. आसु, ता. फलटण जि. सातारा) यांनी पती आयुब शेख व सासू बाळी शेख यांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी वालचंदनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला होता.
दरम्यान, रेश्माचा पती आयुब शेख यांना सासूने पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केल्याची माहिती दिल्यानंतर आयुब शेख यांनी ही खाराओढा येथे शुक्रवारी (ता. ३) रोजी ओढ्यानजीक गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.