Pune Crime : पुणे : एकीकडे पुणे शहरात चोरींच्या (thieves) घटनांमध्ये मोठी वाढ झालेली दिसून येत आहे तर दुसरीकडे यावर आळा घालण्यासाठी पोलीस (police) प्रशासनांची दमछाक (exhausted) होताना दिसून येत आहे. असे असताना भल्या सकाळीच (Early morning) पॅसेंजरची वाट पाहत थांबलेल्या ज्येष्ठाला (To the elder) दोन चोरट्यांनी लुटत त्यांच्याकडील जबरदस्तीने रिक्षा (rickshaw) पळविल्याचा प्रकार समोर आला आहे. १० मार्च रोजी सकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली आहे. (Pune Crime)
समर्थ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल..!
याप्रकरणी ६० वर्षीय व्यक्तीने समर्थ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानूसार, दोन अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल केला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे रिक्षा चालक आहेत. ते सकाळी पॅसेंजरची वाट पाहत थांबलेले होते. यादरम्यान, तक्रारदारांना ओळखत असलेला एकजन व त्याच्यासोबत एकजन आला. त्या दोघांनी त्यांच्या रिक्षात जबरदस्तीने बसून त्यांच्याकडील जबरदस्तीने चावी घेऊन त्यांच्याशी झटापटकरून रिक्षा घेऊन पसार झाले. त्यांनी आरडाओरडा केला.
दरम्यान, सकाळी सकाळी घटना घडल्याने हे चोरटे पसार होण्यात यशस्वी झाले. त्यांनी समर्थ पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली. पोलिसांकडून सीसीटीव्हीच्या माध्यमातून चोरट्यांचा शोध सुरू आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.