यवत, (पुणे) : Daund Crime पोलिसांना दारूच्या भट्ट्यांची महिती दिल्याच्या संशयावरून कानगाव (ता. दौंड) (Daund Crime) ग्रामपंचायत हद्दीत राहणाऱ्या दोन कुटुंबात झालेल्या मारहाणीत एकमेकांच्या विरोधात परस्परविरोधी गुन्हे यवत पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणी दोन्ही कुटुंबातील ११ जणांवर वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. (Daund Crime)
यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
मिळालेल्या माहितीनुसार, कानगाव ग्रामपंचायत हद्दीत हे दोन कुटुंबे शेजारी शेजारी राहतात. त्यानुसार मागील काहीं दिवसांपूर्वी यवत पोलिसांनी कानगाव परिसरात असलेल्या दारू हातभट्टीवर कारवाई करून गुन्हे दाखल केले होते. त्यानुसार आमच्या दारूच्या भट्ट्यांची पोलिसांना का माहिती देता याच्यावरून हा वाद सुरु झाला होता. त्यानुसार एका महिलेला विष पाजण्यापर्यंत पोहोचला. मग शेजारी राहणाऱ्या महिलेच्या कुटुंबियांनी समोरच्या घरातील महिलेचा विनयभंग केला.
कानगावातील या भांडणात दोन्ही गटातील प्रत्येकी एक जणावर पोलीस ठाण्यात पूर्वीच्या गुन्ह्यांची नोंद आहे. याप्रकरणी यवत पोलिसांनी दोन्ही गटातील ११ जणांविरोधात वेगवेगळे गुन्हे दाखल केले. यापैकी दोन महिलांसह चार जणांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला असून, या चार जणांनी एका महिलेला विषारी औषध पाजल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार दोन्ही कुटुंबातील महिलांनी यवत पोलिसांकडे फिर्याद दिली.त्यानुसार दोन्ही कडील ११ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, त्यावरून विनयभंगाचा व मारहाणीचा गुन्हा तीन महिलांसह सात जणांविरोधात पोलिसांनी दाखल केला आहे. या गुन्ह्यातील एका गटाच्या फिर्यादीचा तपास फौजदार नागरगोजे करत असून, दुसऱ्या गटातील फिर्यादीचा तपास पोलीस हवालदार बंडगर करीत आहेत.