जेजुरी : पुतण्या शेतात आल्याचे पाहून काकाने चक्क रॉकेल ओतून पुतण्याला पेटवून देण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना वागदरवाडी (ता. पुरंदर) येथे घडली आहे.
भास्कर त्रिंबक भुजबळ (रा. वाघदरवाडी ता. पुरंदर) असे काकाचे नाव आहे. याप्रकरणी शारदा नानासाहेब भुजबळ (वय – ६२, व्यवसाय शेती (रा. वाघदरवाडी ता. पुरंदर) मूळ रा. दत्तनगर कात्रज यांनी जेजुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाघदरवाडी ग्रामपंचायत हद्दीत भास्कर भुजबळ व नानासाहेब भुजबळ यांची शेती आहे. शनिवारी (ता. ०७) दुपारी १ वाजण्याच्या सुमारास भास्कर भुजबळ यांनी फिर्यादी शारदा भुजबळ यांना न विचारता उसाचे पिक घेवुन उस तोड सुरू केलेली उस तोडणीचे काम थांबविण्या करीता गेले होते.
दरम्यान, यावेळी भास्कर भुजबळ याने अगोदर कर्जाचे पैसे दया असे म्हणुन षिवीगाळ, दमदाटी करीत मुलगा स्वप्नील भूजबळ याचे अंगावर एक लिटर मापाचे प्लाटीक कॅन्ड मधील राँकेल टाकुन हातातील लाकडी पेटत्या टेम्ब्याने पेटवुन देवुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. म्हणुन भास्कर त्रिंबक भुजबळ याचेविरूध्द तक्रार दिली आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक गावडे करित आहेत.