पुणे : एका ७९ वर्षीय वयोवृद्धाची डेटिंगसाठी मुलगी हवी आहे का? असे म्हणत गेल्या ६ महिन्यांपासून १७ लाख रुपयांची फसवणूक झाली धक्कादायक घटना वारजे भागातून समोर आली आहे.
याप्रकणी अनोळखी व्यक्तीवर पुण्यातील वारजे पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वयोवृध्द ७९ वर्षीय असून ते बँकेतून सेवा निवृत्त झाले आहेत. त्यानंतर डिसेंबर महिन्यात एका अनोळखी नंबरवरून त्यांना फोन आला.
श्रेया नावाच्या मुलीचा त्यांना फोन करून ‘तुम्हाला डेटिंगसाठी मुलगी हवी आहे का’ असे विचारले. त्यानंतर त्या व्यक्तीने ज्येष्ठ व्यक्तीकडून काही रक्कम भरा असे सांगितले.
दरम्यान, काही रक्कम भरल्यानंतर या वयस्कर व्यक्तीला नेहमी त्या नंबरवर फोन येत होते. त्यानंतर ही आरोपीने पैश्याची मागणी केली. वयोवृद्धाने तब्बल ७ महिने या आरोपीच्या बँक खात्यात १७ लाख रुपये भरले.
त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येता त्यांनी पोलिसात धाव घेतली. याप्रकरणी अनोळखी व्यक्तीवर पुण्यातील वारजे पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास वारजे पोलीस करीत आहेत.