मुंबई : दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची पूर्वींची व्यवस्थापक दिशा सालियन हिचा दारूच्या नशेत तोल गेल्याने आणि १४ व्या मजल्यावरून पडून डोक्याला गंबीर इजा झाल्याने मृत्यू झाल्याचे सीबीआयने दिलेल्या अहवालात म्हटले आहे.
दिशा सालियन आणि सुशांतसिंह राजपूत या दोघांच्या मृत्यूनंतर राजकीय आरोपांची मोठी राळ उठली होती. सर्वानीच एकमेकांवर आरोप करताना महाराष्ट्रातील वातावरण चांगलेच तापवले होते. यात तत्कालीन वन मंत्री व शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांच्यावर देखील अनेक गंबीर आरोप करण्यात आले होते.
मात्र या दिशा सालियन प्रकरणात सीबीआयने दिलेल्या अहवालाने हे आरोप एकप्रकारे खोटे ठरले आहेत.
सन २०२० मध्ये अभिनेता सुशांतसिंह राजपूतची एकेकाळची मॅनेजर दिशा सालियनचा सुशांतचा मृत्यू होण्याच्या काही दिवसांआधी इमारतीच्या १४ व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला होता.
दिशाने आत्म्हत्या केली, असं म्हटलं जात असताना याला थेट राजकीय वळण मिळाले. त्यानंतर दिशावर सामूहिक बलात्कार करून हत्या झाल्याचा आरोप करण्यात आला होता.