पुणे : सदरक्षणाय खलनिग्रहणाय’ हे पोलीस खात्याचे ब्रिदवाक्य, मात्र या वाक्याला छेद देणारी घटना जिल्हा ग्रामिन पोलिस दलात घडली आहे. नागरीकांच्या अब्रुचे रक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या एका पोलिस कर्मचाऱ्याने, आपल्याच खात्यातील महिला कर्मचाऱ्यांच्या अब्रुची लक्तरे वेशीवर नेऊन टांगल्याचा लाजीरवाणा प्रकार उघडकीस आला आहे.
जिल्हा (ग्रामिण) पोलिस दलातील एका पोलिस कर्मचाऱ्यांने आपल्याच महिला सहकारी पोलिस कर्मचाऱ्यांचे, नको त्या अवस्थेमधील फोटो जवळच्या मित्रांना दाखवुन तिच्या अब्रुची लक्तरे वेशीवर नेऊन टांगल्याचा लाजीरवाणा प्रकार उघड झाला आहे.
संदीप कुंडलिक जाधव हे त्या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव असुन, त्याच्या महिला सहकारीपोलिस कर्मचाऱ्याने दिलेल्या तक्रारीनुसार, खडक पोलिसांनी संदीप जाधव याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
खडक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीप जाधव व त्याची कथीत मैत्रीन दोघेही पुणे ग्रामीण पोलीस दलात कार्यरत आहेत. फिर्यादी व आरोपी हे एकत्र काम करीत असताना आरोपीने फिर्यादी यांना लग्नाचे आमिष दाखवून फिर्यादीच्या इच्छेविरुद्ध शरीर संबंध ठेवले. संदीप जाधव याचे फिर्यादीबरोबर अनैतिक संबंध असतानाच, त्याचे आनखी कांही मुलींच्याबरोबर अनैतिक संबध असल्याची कुणकुण फिर्यादीला लागली होती. तसेच संदीप जाधव याने मागिल कांही दिवसापासुन फिर्यादीचे नको त्या अवस्थेमधील फोटो मित्रांना दाखवुन, फिर्यादीची बदनामी करण्यास सुरुवात केली होती. याबाबत फिर्यादीनेविचारणा कऱण्यास सुरुवात करताच, त्याने फिर्यादीला वारंवार मारहाण करुन जिवे मारण्याची धमकी देण्यास सुरुवात केली होती.
दरम्यान वरील प्रकार मागिल दोन वर्षापासुन सुरु होता. मात्र संदीप जाधव यांची मारहान वाढल्याने, अखेर त्याच्या महिला सहकाऱ्याने शहर पोलिसांच्या खडक पोलिसात जावुन संदीप जाधव याच्या वरोधात लेखी तक्रार दिली. यावरुन पोलिसांनी संदीप विरोधात गुन्हा दाखल करण्याबरोबरच त्याला बेड्याही ठोकल्या.