राहुलकुमार अवचट
यवत : यवत परिसरात नामांकित फायनान्स कंपनीच्या नावाखाली जबरी चोरीची चर्चा सुरु आहे. त्यामुळे नागरिकांनी या फसवणूकीपासून सावध राहावे. असे आवाहन यवत पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नारायण पवार यांनी केले आहे.
पुढे बोलताना पवार म्हणाले कि, नागरिकांना नामांकित कंपनीच्या फायनान्सच्या नावाखाली कर्जाचे हप्ते थकीत असल्याची कारणे सांगून नागरिकांची फसवणूक होत आहे. जर कोणी कर्ज हफ्ते थकीत आहेत असे सांगून वाहन थांबवून परस्पर जप्ती कारवाई करुन वाहन घेऊन जात असेल. तर तात्काळ पोलीस स्टेशनला कळवा.
दरम्यान, फायनान्स वाले वाहन ताब्यात घेत असले तरी त्यांनी कायदेशीर प्रोसिजर पूर्ण केल्याशिवाय त्यांच्या ताब्यात कोणीही वाहने देऊ नये. त्यांना पोलीस प्रोटेक्शनमध्ये जप्ती कारवाई करावी लागते. याउलट पोलीस बरोबर नसताना जर कोणी वाहन ओढून घेऊन जात असेल तर असे वाहन कोणीही सदर फायनान्स वाल्याच्या ताब्यात देऊ नये. अशा वेळी तात्काळ ११२ किंवा जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क करावा. असेही पवार यांनी यावेळी सांगितले आहे.