Mumbai News : मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी कर्जत येथील एनडी स्टुडिओमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. एनडी स्टुडिओमधील काही कर्मचाऱ्यांना गळफास लावलेल्या अवस्थेत नितीन देसाई दिसून आले. पण आता त्यांनी आत्महत्येपूर्वी रेकॉर्ड केलेल्या ऑडिओ क्लिपची सध्या चर्चा सुरू झाली आहे.(Mumbai News)
आत्महत्येपूर्वी रेकॉर्ड केलेल्या ऑडिओ क्लिपची सध्या चर्चा सुरू.
नितीन देसाई मंगळवारी मध्यरात्री दिल्लीहून मुंबई विमानतळावर पोहोचले. तेथून कार घेऊन ते अडीच वाजता कर्जत येथील एनडी स्टुडिओत पोहोचले. यानंतर त्यांनी मॅनेजरशी चर्चा केली. तेव्हा त्यांनी मॅनेजरला सकाळी व्हॉईस रेकॉर्डर देतो, असे सांगितले. त्यांच्या सूचनेनुसार मॅनेजर त्यांच्याकडे व्हाईस रेकॉर्डर घेण्यासाठी सकाळी गेला. मॅनेजरने नितीन देसाई यांना एनडी स्टुडिओतील त्यांच्या खोलीत शोधले. पण देसाई तिथे नव्हते. यानंतर नितीन देसाई हे गळफास घेतल्याच्या स्थितीत आढळून आले. तिथचं देसाई यांचा व्हॉईस रेकॉर्डर होता. त्या व्हॉईस रेकॉर्डरमध्ये काही व्हॉइस नोट्स आहेत. त्यात त्यांनी चार व्यावसायिकांचा उल्लेख केला असल्याचे सांगण्यात येत आहे.(Mumbai News)
दरम्यान, आर्थिक व्यवहारानंतर त्यांनी आपला कसा छळ केला, आपल्यावर कसा दबाव टाकला याचा उल्लेख आहे. त्यामुळे आता हे चार व्यावसायिक तपासाच्या फेऱ्यात अडकण्याची शक्यता आहे.(Mumbai News)