DIG C Vijayakumar मुंबई : पोलीस उपमहानिरीक्षक (कोइम्बतूर श्रेणी) सी विजयकुमार यांनी शुक्रवारी सकाळी रेसकोर्स येथील त्यांच्या कॅम्प ऑफिसमध्ये त्यांच्या सर्व्हिस पिस्तूलने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. (DIG C Vijayakumar)
घटनेने परिसरात खळबळ..
डीआयजी विजयकुमार यांनी सकाळी सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास शहरातील रेड फील्ड्समध्ये बांधलेल्या घरात स्वतःवर गोळी झाडून आयुष्य संपवले. (DIG C Vijayakumar)
मिळालेल्या माहितीनुसार, विजयकुमार सकाळी फिरायला बाहेर पडले आणि पाऊणे सात वाजण्याच्या सुमारास त्यांच्या कॅम्प ऑफिसमध्ये पोहोचले. कॅम्प ऑफिसमध्ये कर्तव्यावर असलेल्या इतर पोलिसांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना याची माहिती दिली, त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
२००९ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असलेले यावर्षी ६ जानेवारी रोजी डीआयजी म्हणून पदभार स्वीकारला होता. याआधी, त्यांना पोलीस उपायुक्त, अण्णा नगर, चेन्नई आणि पोलीस अधीक्षक म्हणून, कांचीपुरम, कुड्डालोर, नागापट्टिनम आणि तिरुवरूर येथे नियुक्त करण्यात आले होते.
मुख्यमंत्र्यांनी शोक व्यक्त केला…
“विजयकुमार यांनी त्यांच्या कार्यकाळात जिल्हा एसपीसह विविध जबाबदाऱ्यांमध्ये तमिळनाडू (TamilNadu) पोलिस दलाची चांगली सेवा केली होती. त्यांच्या निधनाने तामिळनाडू पोलिस विभागाचे मोठे नुकसान झाले आहे.. अशा शब्दात मुख्यमंत्री एम.के स्टॅलिन यांनी शोक व्यक्त केला.(DIG C Vijayakumar)