मोडनिंब, (सोलापूर) : सोलापूरवरून पुण्याच्या दिशेने निघालेल्या एका ४३ वर्षीय दिव्यांग व्यक्तीचा एस. टी. बसमध्येच हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. (Hadapsar News)
चंद्रशेखर देविदास चांदणे (वय – ४३ रा. ससाणे नगर, हडपसर पुणे) असे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,
तुळजापूरहून सकाळी सव्वा सात वाजता इंदापूर डेपोची तुळजापूर – पुणे ही बस निघाली होती. या बस मध्ये इतर प्रवाशांसह चंद्रशेखर चांदणे हे देखील या बस मध्ये प्रवास करत होते. ते वाहन चालकाच्या शेजारी असलेल्या डाव्या बाजूच्या सीटवर बसले होते. (Hadapsar News)
चालक गणेश देवकर यांनी दिलेल्या माहितीनुसार तुळजापूर ते सोलापूर व मोहोळपर्यंत येईपर्यंत चांदणे हे फोनवर बोलत होते. बस मोहोळ पासून पुढे आल्यानंतर ते झोपी गेले. त्यानंतर बस मोडनिंब येथील बस स्थानकाकडे वळत असताना चांदणे यांची हालचाल होत नसल्याचे वाहन चालकाच्या लक्षात आले. (Hadapsar News)
त्यांनी कंडक्टरला त्यांना उठवण्यासाठी सांगितले. कंडक्टरने त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला पण काहीच प्रतिसाद मिळला नाही. चांदणे यांच्या तोंडावर पाणी देखील मारले तरीही काहीच प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी नियंत्रण कक्ष अधिकाऱ्याला सांगितले. तातडीने रुग्णवाहिका बोलवण्यात आली.
रुग्णवाहिकेतून त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले. यावेळी कॉन्स्टेबल आसिफ आतार यांनी सदर घटनेची माहिती घेतली. चालक वाहक यांच्या जबाबानंतर आणि पंचनाम्यानंतर बस सोडण्यात आली दरम्यान या बस मध्ये प्रवास करनाऱ्या प्रवाशांना दुसऱ्या बस ने पुढे पाठवण्यात आले. (Hadapsar News)
दरम्यान, एसटीचा प्रवास करत असतानाच हृदयविकाराचा झटका येऊन त्यांच्या मृत्यूने जीवनाच्या प्रवासाचा देखील शेवट झाल्याने मोडनिंब उपस्थित बस स्थानकातील प्रवाशांनी हळहळ व्यक्त केली. अधिक तपासन हवालदार गणेश जगताप करीत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा..
Hadapsar | हडपसरमध्ये पुन्हा गुंडाराज; बाजार समितीच्या आवारातच व्यापाऱ्याला मारहाण
Hadapsar Railway Station | हडपसर टर्मिनलसाठी तब्बल १३६ कोटी ; रेल्वे प्रवास होणार सुसाट