Dhule News : धुळे : राजकीय वर्तुळातून खळबळजनक बातमी समोर आली आहे. धुळे जिल्ह्यातील उभंड- पिंपरखेड येथील स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या शहराध्यक्षाची गोळ्या झाडत चाकूने गळा चिरून हत्या करण्यात आली आहे. गुरुवारी (दि. 26) रोजी रात्री 9 च्या सुमारास ही घटना घडली आहे. दोन अज्ञात व्यक्तींनी हा हल्ला केला आहे. (swabhimani republican party city president shot dead)
धुळे जिल्ह्यातील उभंड येथील घटना
यशवंत बागुल (मिलिंद सोसायटी,साक्री रोड धुळे) असे खून करण्यात आलेल्या स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या शहराध्यक्षाचे नाव आहे. (Dhule News) या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी घटनास्थळी धाव घेतली आहे.
मिळालेल्या माहितीवरुन, शहराध्यक्ष बागुल हे त्यांच्या शेतीच्या कामासाठी धुळे तालुक्यातील उभंड या ठिकाणी गेले होते. शेतातील डाळिंबाच्या झाडांना बांबू लावण्यासाठी आणि मजूर शोधण्यासाठी त्यांच्या मामाचा मुलगा व यशवंत बागुल हे शेजारी असलेल्या पिंपरखेड या गावी गेले.(Dhule News) त्यावेळी त्यांच्यावर अचानक दोन अज्ञातांनी हा हल्ला केला आहे. बागुल यांच्यावर एकाने बंदुकीतून गोळी झाडली तर दुसऱ्याने चाकूने छातीवर व गळ्यावर वार कर खून केला आहे.
दरम्यान, हा खून कोणत्या कारणातून करण्यात आला हे अद्याप समोर आले नाही. (Dhule News) याप्रकरणी बागुल यांच्या पत्नीने धुळे तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यावून आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Dhule Crime : जुगाऱ्यांचा पोलीस कर्मचाऱ्यांवर हल्ला ; ५ पोलीस जखमी ; २३ जणांविरूध्द गुन्हा दाखल..!
Solapur Crime : संतापजनक ! १८ दिवसाच्या बाळाला तीन महिलांनी ३ लाखाला विकले