Dhakka News : ढाका : बांगलादेशमधून धक्कादायक बातमी समोर येत आहे. बांगलादेशची राजधानी ढाक्यापासून २९६ किलोमीटर अंतरावर असलेल्या कॉक्स बाजार जिल्ह्यात मुस्लिम भाविकांना घेऊन जाणारी बस पुलावरून तळ्यात कोसळून भीषण अपघात झाला. या बसमध्ये ४३ भाविक होते. त्यापैकी १७ भाविक जागीच ठार झाले. मृतांमध्ये तीन लहान मुलांचा देखील समावेश आहे. या अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या ३५ जणांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही दुर्घटना शनिवारी दुपारी बांगलादेशातील छत्रकांडा परिसरात घडली असून, बसमध्ये प्रवाशांची प्रचंड गर्दी असल्याची माहिती समोर येत आहे.
चालकाचा निष्काळजीपणा बेतला प्रवाशांच्या जीवावर!
या घटनेबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, अपघातग्रस्त बस बशर स्मृती परिवहनची होती. या बसची क्षमता ५२ प्रवाशांची असताना देखील या बसमधून ६० प्रवासी प्रवास करत होते. (Dhakka News) ही बस शनिवारी सकाळी नऊ वाजता पिरोजपूरवरून भंडरियाकडे निघाली होती. त्यानंतर ही बस बरिशाल-खुलना राष्ट्रीय महामार्गावरून जात असताना हा अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा बस तळ्यात कोसळून हा अपघात झाला असावा, अशी माहिती समोर येत आहे.
दरम्यान, या जीवघेण्या अपघातातून वाचलेल्या प्रवाशाने अपघाताबाबत माहिती देताना सांगितले की, या बसमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी भरले होते. (Dhakka News) प्रवासी अत्यंत धोकादायक स्थितीत प्रवास करत होते. याबाबत संबंधित प्रवाशाने चालकाला कल्पनादेखील दिली होती. मात्र, चालकाकडून कोणतेही प्रत्युत्तर मिळाले नाही. त्यानंतर काही वेळातच बस महामार्गावर अचानक खाली उतरली आणि तळ्यात उलटली. या अपघातामध्ये १७ निष्पाप जिवांचा मृत्यू झाला आहे.
याबाबत अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातात १७ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर इतर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (Dhakka News) पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातातील बहुतेक बळी पिरोजपूरच्या भंडारिया उपजिल्हा आणि झलकाठीच्या राजापूर भागातील रहिवासी आहेत.