पुणे : वेल्हे तालुक्यात भरदिवसा एकाची अज्ञात व्यक्तीकडून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. गोळीबाराच्या या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. गोळीबाराची माहिती मिळताच तात्काळ वेल्हे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. गोळीबारानंतर आरोपी पसार झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवनाथ उर्फ पप्पूशेठ रेणूसे (रा. पाबे, रामवाडी) असे गोळीबारात खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांच्यावर अज्ञातांनी गोळीबार केला आणि दुचाकीवरुन पळून गेले. यामध्ये गंभीर जखमी होऊन रेणूसे यांचा मृत्यू झाला. वेल्हे पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
घटनेची माहिती मिळताच वेल्हे पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होत घटनास्थळाचा पंचनामा केला रेणूसे यांच्यावर हल्ला केल्यानंतर हल्लेखोर दुचाकीवरुन पळून गेले आहेत. वेल्हे पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू करण्यात आला आहे. दरम्यान हा खून नेमका कोणत्या कारणामुळे करण्यात आला हे अद्याप समजू शकले नसून पोलीस यामागचा शोध घेत आहेत. पुढील तपास पोलीस करत आहेत.