Daund SRPF News : दौंड (पुणे) राज्य राखीव पोलिस बलाच्या शिपाई भरतीसाठी लेखी परीक्षेला कॉपी केल्याप्रकरणी तिघांवर शासनाची फसवणूक केल्याचा गुन्हा करण्यात आला आहे.(Daund SRPF News)
तिघांवर गुन्हा दाखल.
प्रदीप आबासाहेब गदादे (रा. बेनवडी ता. कर्जत, जि. अहमदनगर) सुदर्शन उत्तमराव बोरूडे (रा. श्रीगोंदा जि. अहमदनगर) सतीश शिवाजी जाधव (रा. हिरडगाव, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. याप्रकरणी दौंड येथील राज्य राखीव पोलिस बल गट क्रमांक ५ चे पोलिस नाईक नीलेश धुमाळ यांनी फिर्याद दिली आहे.(Daund SRPF News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (ता. २३) रोजी दौंड येथील तुकडोजी विद्यालयात राज्य राखीव पोलिस बल गट क्रमांक ५ साठी सशस्त्र पोलिस शिपाई भरतीची लेखी परीक्षा घेण्यात आली होती. यावेळी परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी संगनमताने पेपर कॉपी करून लिहीत असताना परीक्षा केंद्रावरील शिक्षक आणि राज्य राखीव पोलिस बल गट क्रमांक ५ चे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले.(Daund SRPF News)
दरम्यान, परीक्षा केंद्रात लावलेल्या सीसीटीव्ही मध्येदेखील ही मुलं कॉपी करत असतानाचे चित्रण झाले आहे. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली. तुकडोजी विद्यालयात अठरा खोल्यांमध्ये ५०७ परीक्षार्थी परीक्षा देत होते.