Daund News दौंड : पुणे जिल्ह्यातील दौंड मधून हादरवणारी घटना समोर आली होती. एका डॉक्टरने आपले अख्ख कुटूंबंच संपवल्याची खळबळजनक घटना वरवंड येथे घडली. (Daund News)पतीने पत्नीचा गळा दाबून खून केल्या त्यानंतर दोन मुलांना विहीरीत टाकून त्यांची हत्या केली व स्वतः घरी जाऊन आत्महत्या केली. डॉक्टर यांची पत्नी शिक्षिका होती. (Daund News) या घटनेनंतर पुणे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर या चारही जणांना काल रात्री साडेनऊ वाजता वरवंड येथील स्मशानभूमीत साश्रुनयनांनी अखेरचा निरोप देण्यात आला. (Daund News)
डॉ. अतुल शिवाजी दिवेकर ( वय ४२) पल्लवी अतुल दिवेकर (वय ३९), अदिवत अतुल दिवेकर ( वय ९) वेदांती अतुल दिवेकर (वय ६) अशी यांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, वरवंड येथील गंगासागर पार्कमध्ये घर क्रमांक २०१ मध्ये ही घटना घडली. डॉ. अतुल दिवेकर आणि त्यांची पत्नी पल्लवी दिवेकर यांचे मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळले. पेशाने डॉक्टर असलेल्या अतुल दिवेकर यांनी शिक्षिका असलेल्या पत्नीचा गळा दाबला. नंतर दोन मुलांना विहीरीत टाकून त्यांची हत्या केली आणि स्वतः घरी येऊन आत्महत्या करत आपलं कुटूंब संपवलं.
दरम्यान, डॉक्टर अतुल दिवेकरांनी आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहून त्यामध्ये कौटुंबिक वादाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे डॉक्टर दिवेकर यांनी म्हटल्याने उच्चशिक्षित कुटुंबांना आणि ग्रामीण भागातल्या शेतकरी कुटुंबांनाही मोठा धक्का बसला आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Daund News : दौंड आत्महत्या प्रकरण! कौटुंबिक त्रासाला कंटाळूनच डॉ. अतुल दिवेकरने उचलले टोकाचे पाऊल…