Daund News : केडगाव : दौंड तालुक्यातील चौफुला – बोरीपार्धी हद्दीतील पुणे सोलापूर महामार्ग लगत बंद असलेल्या बोरमलनाथ हॉटेलमध्ये साडेतीन किलोचा ६३ हजार किंमतीचा गांजासाठी यवत पोलीसांनी छापा टाकून जप्त केला आहे. (Cannabis worth 63,000 seized at Chauphula; Four persons arrested, Yavat police action; Four persons arrested, Yavat police action)
याप्रकरणी भिमाबाई दत्तात्रय लकडे (वय ५६),राहुल दत्तात्रय लकडे (वय ३८),अतुल दत्तात्रय लकडे, जयश्री राहुल लकडे (सर्व रा. बोरीपार्धी चैफुला ता.दौंड जि.पुणे) या चौघांवर गुन्हा दाखल करत ताब्यात घेतले आहे.
हॉटेलमध्ये आढळला गांजाचा साठा
मिळालेल्या माहितीनुसार, चौफुला- बोरीपार्धी हद्दीतील बोरमलनाथ हॉटेलमध्ये गांजा साठा असून चोरट्या पद्धतीने विकला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती, (Daund News) गुरुवारी (दि.८) यवत पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे, प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी रेखा वाणी, सहाय्यक पोलीस निरीक्षक केशव वाबळे, उप पोलीस निरीक्षक विजय कोल्हे,पोलीस नाईक विकास कापरे, विशाल जाधव,राजू शिंदे, राहुल गडदे, अश्विनी देवडे आदींच्या पथकाने बोरमलनाथ हॉटेलमध्ये छापा टाकून ही कारवाई केली. तब्बल साडेतीन किलो वजनाचा व ६३ हजार किंमतीचा हिरवट रंगाचा गांजाचा साठा मिळुन आला आहे. पोलिसांनी हा गांजा जप्त केला असून याप्रकरणी चार जणांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर अमली पदार्थ , गुंगीकारक औषधीद्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यवत पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्निल लोखंडे हे प्रकरणाचा तपास करीत आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Daund News : संजय गांधी निराधार योजनेच्या लाभापासून दौंड तालुक्यातील लाभार्थी वंचित…