Daund News | दौंड, (पुणे) : रस्त्यावर अथवा इतर ठिकाणी नागरिक दारु पिऊन धिंगाणा घालतात, त्यावेळी पोलिसांकडून कायद्याचा बडगा दाखवत त्यांच्यावर केली जाते. मात्र पोलिसच दारु पिऊन कर्तव्यावर हजर झाला तर सर्वसामान्यांनी कोणाकडे पाहावे, असा प्रश्न उपस्थित होतो. असाच एक प्रकर दौंड (Daund News) पोलीस ठाण्यात उडकीस आला असून पोलीस कर्मचारीच दारूच्या नशेत डुलत-झुलत कर्तव्यावर हजर झाल्याचा गोंधळ उडाला आहे.
ही घटना शनिवारी (ता. १८) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस नाईक किर्तीशील श्रीकिशन कांबळे (रा. श्री जोगिश्वरी अपार्टमेन्ट, दौंड) असे कर्मचाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी दौंड पोलीस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक भाऊसाहेब जाधव यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दौंड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दौंड शहरातील रेस्ट हाऊससाठी दौंड पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक किर्तीशील कांबळे यांची नियुक्ती करण्यात आली होती.
रेस्ट हाऊसवर गार्डचे कर्तव्यावर…
कर्तव्यावर असताना दारू पिले त्यामुळे त्यांना साधे चालता देखील येत नव्हते. याबाबत सहाय्यक समादेशक रघुनाथ शिंदे यांच्यासमक्ष हजर केल्यानंतर किर्तीशील कांबळे हे रेस्ट हाऊसवर गार्डचे कर्तव्यावर असताना मद्यपान करून आले म्हणून त्यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!
Pune News : पुणेकरांना दिलासा ! 40% मिळकत करातील सवलत कायम राहणार; पीएमपीएमएलची भाडेवाढ होणार नाही
Beauty Tips : मुलायम आणि चमकदार त्वचा बनविण्यासाठी गुलाब फायदेशीर, जाणून घ्या कसा करावा वापर