राहुलकुमार अवचट
Daund Crime | यवत : सुनेने सासूला शेजारी न राहण्याच्या कारणावरून शिवीगाळ व दमदाटी करत मारहाण करत चाकूने वार केल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार देलवडी येथील खंडोबारोड ग्रामपंचायत जवळ घडला आहे.
याप्रकरणी सासू बबई सर्जेराव साळवे (वय ६५) यांनी यवत पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. त्यावरून सून कामेश्वरी मोहन साळवे (रा. देलवडी ता. दौंड, जि. पुणे) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुनेचे व सासुचे शेजारी राहण्यावरून वाद झाला. यावेळी तुम्ही शेजारी राहायचे नाही, येथून निघून जा असे म्हणेत सुनेने सासूला शिवीगाळ व दमदाटी व लाथाबुक्क्यांनी मारहाण करत चाकूने उजव्या हाताच्या बोटावर व पुतण्या सागर साळवे यांच्या दोन्ही हाताच्या दंडावर मारहाण करून दुखापत केल. असे तक्रारीत सासुने नमूद केले आहे.
पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक जाधव हे करीत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!
Crime News | यवत : रिक्षाचालकाने प्रवाशाला लुबाडले; ४५ हजारांचा मुद्देमाल जबरदस्तीने घेऊन फरार
Suicide News : पती-पत्नीच्या आत्महत्येने पुणे जिल्ह्यात खळबळ ; तीन महिन्यापुर्वीच झाला होता विवाह