लोणी काळभोर (पुणे) : लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी दत्तात्रय चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांची वाहतूक शाखेमध्ये बदली करण्यात आली आहे.
दत्तात्रय चव्हाण हे लोणी काळभोरला येण्यापूर्वी खडकीच्या पोलीस ठाण्यात कार्यरत होते. तर रिक्त झालेल्या खडकीच्या पोलीस निरीक्षक पदावर विष्णू ताम्हाणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.