Darshana Pawar Murder Case पुणे : पुणे जिल्ह्याला हादरवणाऱ्या दर्शना पवार हत्याप्रकरणाची मोठी अपडेट समोर आली आहे. दर्शना पवारच्या खुनासाठी वापरलेले कंपासमधील कटर पोलिसांनी आरोपी राहुल हांडोरे याच्याकडून जप्त केले आहे. (Darshana Pawar Murder Case) एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या दर्शना पवार हिचा मृतदेह राजगडाच्या पायथ्याशी 18 जून रोजी आढळून आला होता. तिचा खून हा तिचाच मित्र असलेल्या राहुल हांडोरेने लग्नासाठी नकार दिल्याने केला होता. (Darshana Pawar Murder Case)
दर्शनाच्या हत्येनंतर राहुल हंडोरे यास पुणे पोलिसांनी मुंबईतील अंधेरी रेल्वे स्टेशनवरून अटक केली होती. त्यावेळी त्याने लग्नासाठी नकार दिल्याने तिचा खून केल्याची कबुली पोलीसांना दिली होती. दर्शनाच्या खुनासाठी वापरलेले कंपासमधील कटर पोलिसांनी आरोपी राहुल याच्याकडून जप्त केले आहे. राहुल आणि दर्शना यांनी राजगडला जाण्यासाठी वापरलेली दुचाकी आणि खून करताना आरोपीने घातलेले कपडेही पोलिसांनी जप्त केले आहेत. पुढील तपासासाठी आरोपीच्या पोलीस कोठडीत सोमवारपर्यंत (३ जुलै) वाढ करण्यात आली आहे.
दर्शनाने लग्नाला नकार दिल्याने रागाच्या भरात तिच्यावर कंपासमधील कटर ब्लेडने तीन ते चार वेळा वार केले. यानंतर दगडाने मारहाण करत तिचा खून केला, अशी कबुली आरोपी राहुल याने पोलिसांना दिली होती. त्यानुसार त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेल्या वस्तूंची माहिती घेत त्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत. १८ जून रोजी दर्शना हिचा राजगडच्या पायथ्याशी मृतदेह सापडला होता. ती राहुलसोबत राजगडावर ट्रेकिंगसाठी गेल्याचे समोर आले होते. त्यानंतर त्याला २१ जून रोजी मुंबईत अटक करण्यात आली होती.
दरम्यान, राहुलने गुन्ह्यासाठी आणखी दोन शर्ट वापरले होते. ते अद्याप जप्त करण्यात आलेले नाहीत. तसेच खून करून तो काही दिवस फरार झाला होता. फरार असताना त्याला कोणी मदत केली आहे का? तो नेमका कोणत्या ठिकाणी राहिला, याची माहिती अद्याप मिळालेले नाही. त्यामुळे त्याच्या पोलीस कोठडीत चार दिवसांची वाढ करण्याची मागणी सरकारी वकिलांकडून करण्यात आली.