पुणे : मला तू कॉलजमध्ये होती तेव्हापासून आवडतेस असे म्हणत एका तरुणाने महिलेसोबत गैरवर्तन केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना सोमवारी (ता. ९) रोजी दुपारी घडली आहे. याप्रकणी दाभाडे पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
मोहन गंगाधर साळवे (वय-24 रा. तळेगाव दाभाडे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पीडित महिलेने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, फिर्यादी महिलेचे यशवंत नगर परिसरात किराणा मालाचे दुकान आहे. सोमवारी (ता. ९) रोजी फिर्यादी दुकानात एकट्या असताना आरोपी मोहन साळवे हा दुकानात आला. त्यानंतर आरोपीने तू कॉलेजमध्ये असल्यापासून मला आवडतेस असे म्हणून फिर्यादीमहिला यांच्यासोबत गैरवर्तन केले.
तसेच फिर्यादी या घाबरून तेथून पळून जात असताना आरोपीने त्यांचा पाठलाग केला. याबाबत कोणाला काही सांगितले तर तुला व तुझ्या परिवाराला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली.
त्यानंतर फिर्यादी महिलेने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी आरोपी मोहन साळवे याला अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहे.